ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

व्यापार्‍याचे अपहरण, एक कोटीची मागितली खंडणी

अहिल्यानगर

अहिल्यानगर जिल्ह्यात राहुरी तालुक्यातील तांभेरे येथील एका भुसार मालाच्या व्यापार्‍यांची गाडी सायंकाळच्या सुमारास रस्त्यात अडवून त्यांना दुसर्‍या चारचाकीत बसवून अपहरण करण्यात आले.

त्यानंतर सदर व्यापार्‍याला लाकडी दांड्याने मारहाण करून त्यांना व त्यांच्या कुटुंबाला जिवे ठार मारण्याची धमकी देत एक कोटीची खंडणी मागण्यात आली आहे.बापूसाहेब रामदास गागरे, (वय 39) राहुरी तालुक्यातील तांभेरे येथे राहतात आणि ते भुसार मालाचा व्यवसाय करतात. दि. 13 ऑक्टोबर रोजी सांयकाळी 7 वाजेच्या सुमारास बापुसाहेब गागरे हे त्यांची अशोक लेलँड चारचाकी गाडी घेऊन तांभेरे येथून राहाता तालुक्यातील वाकडी येथे जात होते. त्यावेळी एका पांढर्‍या रंगाच्या चारचाकी वाहनाने त्यांचा पाठलाग करत ते वाहन त्यांच्यामागे गेले. बापूसाहेब गागरे हे वाकडी रस्त्याला निळवंडे कालव्याच्या पाठीमागे रोडने जात असताना आरोपींनी त्यांची गाडी अडवून त्यांना थांबवले. तेव्हा आरोपी गागरे यांना म्हणाले, तुझ्या जवळच्या माणसाने तुझी सुपारी दिलेली आहे. तुला गोळ्या घालायला वेळ लागणार नाही. तू गुपचूप आमच्या गाडीत बस. असे म्हणून आरोपींनी गागरे यांना लोखंडी कत्तीचा धाक दाखवून बळजबरीने त्यांच्या गाडीत बसवून गागरे यांचे अपहरण केले.

आरोपी त्यांना श्रीरामपूरच्या दिशेने एका निर्जन ठिकाणी असलेल्या गोडाऊनमध्ये घेऊन गेले. तेथे गागरे यांना मारहाण करून एक कोटी रुपयांची खंडणी मागितली. तेव्हा गागरे यांनी दहा लाख रुपये देतो, असे सांगितले. त्यानंतर गागरे यांनी त्यांच्या एका मित्राला फोन करून पैशाची मागणी केली. तेव्हा मित्र म्हणाला की, तू समक्ष आल्यावरच मी रक्कम देईन, असे त्याने सांगितले. त्यानंतर तीन ते चार आरोपींनी गागरे यांना लाकडी दांड्याने मारहाण केली आणि जर तू पैसे दिले नाहीस किंवा पोलीस स्टेशनला गेला, तर तुला व तुझ्या कुटुंबाला जिवे ठार मारेल, अशी धमकी दिली. त्यानंतर आरोपींनी गागरे यांच्या डोळ्याला पट्टी बांधून त्यांना चारचाकी वाहनात बसवून राहुरीतील शनिशिंगणापूर फाट्याच्या आसपास सोडले.

दि. 27 ऑक्टोबर रोजी सकाळच्या सुमारास गागरे हे त्यांच्या घरी असताना एका नंबरवरून व्हॉट्सअ‍ॅप कॉल आला.

 

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे