ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

राज्यावर येतंय मोठं संकट ….. हवामान खात्याने दिला मोठा इशारा

राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाचे थैमान बघायला मिळतंय. सतत पाऊस सुरू आहे. दिवाळीमध्येही पाऊस मोठ्या प्रमाणात झाला. दिवाळी संपली असून पाऊस काही जाण्याचे नाव घेत नाहीये.

सध्या राज्यात विविध भागांमध्ये पाऊस सुरू असून रात्रभर मुसळधार पाऊस झाला. सकाळीही ढग कायम असून रिमझिम पाऊस आहे. राज्यात अनेक भागांमध्ये मोठी अतिवृष्टी झाली.

आजही भारतीय हवामान विभागाने पावसाचा अत्यंत मोठा इशारा दिला. बंगालच्या उपसागरावरील कमी दाबाचा पट्टा रविवारी तीव्र होऊन खोल कमी दाबाचा पट्टा बनला आहे. आता त्याचे रूपांतर मोंथा चक्रीवादळात होण्याची शक्यता आहे. या चक्रीवादळामुळे अनेक राज्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.राज्य सरकारने चक्रीवादळाला तोंड देण्यासाठी सर्व तयारी पूर्ण केली आहे.

राज्यातील सागरकिनाऱ्यावरील सर्व मच्छीमारांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार, पश्चिम किनारपट्टीवर 25 ते 29 ऑक्टोबर 2025 या कालावधीत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे वाऱ्याचा वेग 35 ते 45 किमी प्रतितास राहील. काही ठिकाणी वाऱ्याचा वेग 55 किमी प्रतितासपर्यंत जाऊ शकतो.हवामान विभाग आणि भारतीय तटरक्षक दलाने मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा दिला आहे.

मुंबईत आज हवामान ढगाळ आहे, तर पुढील दोन दिवस पावसाची शक्यता आहे. अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात कमी दाबाची क्षेत्रे सक्रिय झाल्यामुळे ऑक्टोबर अखेरपर्यंत राज्यात पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

मुंबईसह उपनगरातील काही भागांत रविवारीही दिवसभर पावसाची रिपरिप सुरू होती. आजही संध्याकाळी अशीच परिस्थिती राहणार असल्याची माहिती आहे.

हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात रविवारी सकाळी 8.30 ते सायंकाळी 5.30 पर्यंत 14.6 मिमी, तर सांताक्रूझ केंद्रात 6.6 मिमी पावसाची नोंद झाली. अरबी समुद्रातील कमी दाबाचे क्षेत्र शनिवारी नैर्ऋत्येकडे सरकले. पुढील 24 तासांत हे कमी दाबाचे क्षेत्र नैर्ऋत्येकडे आणि नंतर पूर्व-मध्य अरबी समुद्र ओलांडण्याची शक्यता आहे.

हे कमी दाब क्षेत्र महाराष्ट्र किनारपट्टीजवळून प्रवास करणार असल्याने कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण अधिक असेल. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात राज्यातील हवामान कोरडे होण्याचा अंदाज आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे