ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकिय

‘देवाभाऊ’, आमच्या अक्षयदादाला देताय ना राज्याच्या राजकारणात ‘संधी’?… कारण तीच ठरणार आहे स्व.शिवाजीराव कर्डिलेंना खरी श्रद्धांजली…!

अहिल्यानगर

अहिल्यानगरच्या गांधी मैदानात मोटरसायकल लावून त्याठिकाणी नगर शहराच्या विविध भागातल्या नागरिकांना दुधाचा रतीब घालणारा छोट्याशा गावचा एक सामान्य दूध विक्रेता भविष्यकाळात आमदार आणि राज्यमंत्री होईल, असं भाकित जर त्यावेळी कोणी वर्तविलं असतं तर ते भाकित वर्तविणाऱ्या त्या व्यक्तीला सारेच हसले असते. पण राजयोग ही काही कोणा एकाची मक्तेदारी किंवा जहागिरी नाही.

एखाद्याच्या आयुष्यात राजयोग कधी आणि कसा येईल, हे कोणताही भविष्यवेत्ता ठामपणे सांगू शकत नाही. कारण राजयोग येण्यासाठी सामान्य – अति सामान्य किंवा गरीब – श्रीमंत असा कुठलाही निकष आवश्यक ठरत नाही.

वयाच्या ६७ व्या वर्षी आपल्या सर्वांचा अचानकपणे निरोप घेणारे माजी मंत्री स्व. शिवाजीराव कर्डिले यांच्या आयुष्यात मात्र हा राजयोग पटकन आला. साधा दूध विक्रेता सरपंच पदापासून आमदार आणि थेट मंत्री पदापर्यंत मजल मारतो, ही न भूतो न भविष्यती अशी या राज्याच्या राजकारणातली वास्तवातली घटना आहे.

माजी मंत्री स्वर्गीय कर्डिले यांच्याच पावलावर पाऊल ठेवून मोठ्या आत्मविश्वासाने सामाजिक आणि राजकीय वाटचाल करत असलेले त्यांचे पुत्र अक्षय दादा कर्डिले यांच्यामध्येसुद्धा वडील स्व. कर्डिले यांच्यातले संघटन कौशल्य, कार्यकर्त्यांना बळ देणं, सामान्यांच्या प्रश्नांसाठी सरकारी अधिकाऱ्यांशी वेळप्रसंगी कटूता घेणं, सामान्य कार्यकर्ता आपल्या घरातलाच सदस्य असल्याचं मानणं हे आणि इतर सारे सद्गुण अगदी सहजासहजी उतरले आहेत.

अक्षय दादा कर्डिले यांच्यामध्ये स्व. कर्डिले यांच्याइतकीच धमक आहे. स्वर्गीय कर्डिले यांच्या निधनाने राहुरी – नगर मतदार संघावर शोक काळा पसरली असून राजकीय समीकरणं बदलली आहेत.

या सर्व पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आमचा सवाल आहे, देवाभाऊ’, आमच्या अक्षयदादाला देताय ना राज्याच्या राजकारणात ‘संधी’? कारण स्व. शिवाजीराव कर्डिलेंना तीच खरी श्रद्धांजली ठरणार आहे.

सामान्य कार्यकर्त्यांसह मतदारांच्या प्रश्नांना प्रथम प्राधान्य देऊन वेळप्रसंगी नियम बाजूला ठेवून मतदारांचा प्रश्न मार्गी लावण्याचे आदेश माजी मंत्री स्वर्गीय कर्डिले सरकारी अधिकाऱ्यांना नेहमीच देत असतात. लोकांची कामं होणं महत्त्वाचं आहे. त्यासाठी नियमांवर बोट ठेवून वागणार असाल तर गाठ माझ्याशी आहे, असा सज्जड इशारादेखील माजी मंत्री स्वर्गीय कर्डिले यांनी अनेकवेळा दिलेला आहे.

अर्थात सरकारी अधिकाऱ्यांचाही त्याबाबतीत स्वर्गीय कर्डिले यांना कधी विरोध झाला नाही. सर्वच राजकीय पक्षातल्या मोठमोठ्या नेत्यांबरोबर मैत्रीचे घनिष्ठ संबंध प्रस्थापित करण्यात स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले यशस्वी ठरले होते. त्यांचाच वारसा अक्षय दादा कर्डिले हे यापुढे नक्कीच चालवतील, असा या मतदारसंघातल्या मतदारांना विश्वास आहे.

स्वर्गीय कर्डिले यांच्या निधनामुळे नगर – राहुरी मतदारसंघात विधानसभेची पोटनिवडणूक घ्यावी लागणार आहे. त्यासाठी अनेक संधी साधू मंडळी पुढे येतील. जनतेचा प्रचंड कळवळा असल्याचं नाटक करतील. वेळप्रसंगी स्वतःच्या वाड्यावर सामान्य माणसाला तासनतास बसवून ठेवणारे आता आपणच या मतदारसंघातल्या मतदारांचे एकमेव कैवारी असल्याचं भासवतील.

परंतू अतिशय सामान्य घटकांमधून राज्याच्या राजकारणात आलेले स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले यांचे चिरंजीव अक्षय दादा कर्डिले हे सामान्य मतदाराचे प्रतिनिधित्व यशस्वीपणे करत आहेत. त्यामुळे भविष्यात अक्षयदादा कर्डिले यांना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या राज्याच्या राजकारणात संधी द्यावी, अशी अपेक्षा या मतदारसंघातले मतदार व्यक्त करत आहेत.

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे