ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

अनधिकृत फ्लेक्सवर नगर शहरात विनापरवाना फ्लेक्स दोघांवर गुन्हा दाखल

अहिल्यानगर

परवानगीशिवाय फ्लेक्स लावल्यास कठोर कारवाई करणार : आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे

अहिल्यानगर शहरात विनापरवाना फ्लेक्स लावणाऱ्यांवर महानगरपालिकेने कारवाईचा बडगा उगारला आहे. प्रेमदान चौक व नागापूर पुलाजवळ दोन ठिकाणी लावण्यात आलेल्या फ्लेक्स प्रकरणी महानगरपालिकेने तोफखाना पोलिस ठाण्यात फिर्याद देऊन गुन्हा दाखल केला आहे. परवानगीशिवाय फ्लेक्स लावून विद्रुपीकरण केल्यास कठोर कारवाई करणार आहे. फौजदारी व दंडात्मक अशा दोन्ही स्वरूपाच्या कारवाया केल्या जातील, असा इशारा आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी दिला आहे.

सावेडी प्रभाग कार्यालयाचे प्रभाग अधिकारी बाळासाहेब लक्ष्मण पवार यांनी फिर्याद दिली आहे. अहिल्यानगर – मनमाड रोड, प्रेमदान चौक, कोहिनुर मॉलसमोर, सावेडी येथे रस्त्याच्या मध्यभागी लाईटच्या खांबाला मंगलमुर्ती वास्तु प्रा. लि. या नावाचा साधाराण फ्लेक्स बोर्ड बेकायदेशीर लावण्यात आलेला होता.

तसेच नागापुर येथे पुलाच्या बाजूला रस्त्याच्या मध्यभागी लाईटच्या खांबाला आकाश कातोरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा असा फ्लेक्स बोर्ड लावला होता. सदर फ्लेक्स बोर्ड काढून जप्त करण्यात आलेले आहेत. सदर फ्लेक्स बोर्ड लावल्याप्रकरणी उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार फिर्याद देऊन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरात विनापरवाना फ्लेक्स लावू नये, असे आवाहन वारंवार केले जात आहे. अनधिकृत फ्लेक्सवर कारवायाही सुरू आहेत. यापुढे विनापरवाना फ्लेक्स आढळल्यास फौजदारी व दंडात्मक अशा दोन्ही स्वरूपाच्या कारवाया केल्या जाणार असल्याचे आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी स्पष्ट केले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे