ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

बालक मंदिर महिला मंडळ शाळेत जल्लोषात झाला प्रवेशोत्सव आणि पाठ्यपुस्तक वितरणाचा सोहळा

अहिल्यानगर

बालक मंदिर महिला मंडळ शाळेत २०२६-२७ च्या शैक्षणिक वर्षाचा प्रवेशोत्सव आणि पाठ्यपुस्तक वितरणाचा कार्यक्रम साजरा झाला.

दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाचा शुभारंभ झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महिला मंडळ संस्थेच्या अध्यक्षा सौ. ज्योती केसकर होत्या. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून अहिल्यानगर महानगरपालिकेचे सर्वात तरुण आणि सर्वात जास्त उच्चशिक्षित नगरसेवक ॲडव्होकेट श्री ऋग्वेद गंधे व नगरसेविका सौ.मयुरी सुशांत जाधव, सौ छाया सुरवसे हे उपस्थित होते.

या सर्व उपस्थितांचे स्वागत आणि कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेच्या मा. मुख्याध्यापिका सौ. अस्मिता शूळ यांनी केले. यावेळी नगरसेवक ॲडव्होकेट श्री . ऋग्वेद गंधे व नगरसेविका सौ. मयुरी जाधव यांच्या व मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकाचे वाटप करण्यात आले.

याप्रसंगी अॅडव्होकेट ऋग्वेद गंधे यांनी त्यांच्या शैक्षणिक वाटचालीमधील अनुभव रंजकतेने त्यांनी सांगितले. विद्या हे धन कुणीही चोरून नेऊ शकत नाही हे ही त्यांनी विद्यार्थ्यांना आवर्जून सांगितले व शैक्षणिक वाटचाली विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. तसेच नगरसेविका सौ. मयुरी जाधव यांनी शाळेमध्ये नवनवीन उपक्रम घ्यावेत व त्या उपक्रमांमध्ये आम्हालाही सहभागी होण्याची संधी द्यावी, हे विचार मांडले .

अध्यक्षा सौ. ज्योती केसकर यांनी विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकाचे महत्त्व सांगितले आणि नवीन शैक्षणिक वर्षासाठी शुभेच्छा दिल्या. सौ ज्योती कुलकर्णी , सौ . रोहिणी पुंडलिक, श्री. चितांबर , श्री. छाया सुरवसे , सौ. प्रेमलता सोनग्रा, श्री बडवे इ .मान्यवर यावेळी उपस्थित होते.सौ टकू पवार यांनी आभार मानले .

फलकलेखन श्रीमती मेंद्रे व सौ कवाष्टे यांनी केले .सूत्रसंचालन निरुपमा देशपांडे यांनी केले. या कार्यक्रमासाठी काही पालक आणि विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेच्या सर्व शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे