ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

नगर महापालिका आयुक्तांवर 8 लाखाची लाच मागितल्याचा आरोप..आयुक्त अन लिपिक फरार, आयुक्तांचे दालन पोलिसांच्या ताब्यात, नगरमध्ये एकच खळबळ

अहमदनगर

अहमदनगरमधून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. असं म्हणतात की, भ्रष्टाचार ही प्रशासन व्यवस्थेला लागलेली एक मोठी कीड आहे. जोपर्यंत ही कीड दूर होणार नाही तोपर्यंत देशाचा एकात्मिक विकास होणे ही मोठी दुरापस्त गोष्ट आहे. यामुळे भ्रष्टाचार रोखण्यासाठी शासन आपल्या स्तरावर विविध प्रयत्न करते. भ्रष्टाचार समूळ नष्ट व्हावा हीच सर्वसामान्यांची इच्छा देखील आहे.

मात्र, शासन जेवढा दावा करते तेवढे काम प्रत्यक्षात होत नाही. कारण की आजही भारतात भ्रष्टाचार होतो. अगदी गाव खेड्यापासून ते आयुक्त कार्यालयापर्यंत भ्रष्टाचाराचे लोन पसरलेले आहे. दरम्यान भ्रष्टाचाराची अशीच एक घटना समोर आली आहे ती अहमदनगर मधून. मिळालेल्या माहितीनुसार अहमदनगर महापालिका आयुक्तांनी स्वतः बांधकाम परवाना देण्याच्या बदल्यात लाच मागितली आहे.

आयुक्तांनी लाखो रुपयांची लाच मागितली असून या प्रकरणात नगर महापालिका आयुक्तांवर एसीबीने मोठी कारवाई केली आहे. त्यामुळे सध्या संपूर्ण नगर जिल्ह्यात या प्रकरणाची मोठी चर्चा रंगली आहे.

आम्ही आपणास सांगू इच्छितो की आयुक्त पंकज जावळे यांच्यावर छत्रपती संभाजी नगर ( पूर्वीचे औरंगाबाद ) लाचलुचपत विरोधी विभागाने नुकतीच एक मोठी कारवाई केली आहे.

आयुक्तांवर आठ लाख रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे. याप्रकरणी लाचलुचपत विरोधी विभागाच्या माध्यमातून आयुक्तालयातील क्लर्क आणि आयुक्त यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार आज अर्थातच 27 जून 2024 ला दुपारी आयुक्तांचे दालन अचानकपणे पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आले आहे.

आयुक्त आणि क्लर्क दोन्हीही पसार झाले असल्याने लोकसभा निवडणुकीनंतर पुन्हा एकदा नगर चर्चेत आले आहे एवढे नक्की. अशा परिस्थितीत, आता आपण नेमके हे प्रकरण काय आहे याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत.

काय होते प्रकरण ?

अहमदनगर महापालिका आयुक्त पंकज जावळे यांनी एका कन्स्ट्रक्शन फर्मच्या एका बांधकामासाठी परवानगी देण्याच्या बदल्यात आठ लाख रुपयांची लाच मागितली होती. हि लाच पालिकेचे लिपिक शेखर देशपांडे यांच्या माध्यमातून मागितली गेली होती असा आरोप आहे.

दरम्यान, याप्रकरणी एसीबीकडे तक्रार दाखल झाली. त्यानंतर मग एसीबीने या प्रकरणाचा तपास सुरू केला. विशेष म्हणजे तेव्हापासून महापालिका आयुक्त आणि लिपिक फरार असल्याच्या चर्चा आहेत.

या प्रकरणात एसीबीने तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असल्याची माहिती समोर आली आहे.

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे