ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

पोलीस दलात खळबळ….नगर शहरातील आणखी एका पीआय विरूद्ध अत्याचाराचा गुन्हा दाखल

अहिल्यानगर

अहिल्यानगर शहरातील कोतवाली पोलिस ठाणे हे सर्वांत संवेदशनील भागातील आणि महत्वाचे पोलिस ठाणे आहे. या पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गुन्हेगारी रोखणे आणि कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती कायम राखण्यासाठी पोलिसांना सतत कार्यरत रहावे लागले. असे असले तरी या पोलिस ठाण्यातील नियुक्ती ही प्रतिष्ठेची मानली जाते. त्यामुळे ही मलईदार नियु्क्ती मिळविण्यासाठी पोलिस अधिकाऱ्यांमध्ये स्पर्धा असते.

मात्र, गेल्या अनेक वर्षांपासून या पोलिस ठाण्यात नियुक्त झालेले अधिकारी काही ना काही वादात अडकले आहेत. केवळ भ्रष्टाचार नव्हे तर महिलांवर अत्याचार केल्याच्या प्रकरणात अडकलेल्या अधिकाऱ्यांची संख्या अधिक आहे. मुख्य म्हणजे या पोलिस ठाण्याचा इतिहास पाहिला तर अगदी बोटावर मोजण्याएवढेच अधिकारी आपला कार्यकाळ कोणताही डाग न लागता पूर्ण करून गेले आहेत. बाकीचे कुठल्या ना कुठल्या वादात अडकून येथून गेले आहेत. येथे येताना कडक शिस्तीचे म्हणून ओळख असलेले अधिकारीही वादात अडकून, बदनाम होऊन येथून गेले आहेत. अनेकांना तुरुंगवास भोगावा लागला आहे. अद्यापही अनेक जण येथे असताना दाखल झालेले खटले सोसत आहेत.

अलीकडेच या पोलिस ठाण्यात बदलून आलेले आणि कडक शिस्तीचे म्हणून ओखळले जाणारे पोलिस निरीक्षक प्रताप दराडे हेही आता अशाच प्रकरणात अडकले आहेत.

आजच त्यांच्याविरूद्ध एका तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध ठेवून शिवीगाळ, दमदाटी करत जिवे मारण्याची धमकी दिल्याचा गुन्हा शहरातील तोफखाना पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.

तोफखाना पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार मूळची हुबळी, पश्चिम बंगाल आणि आता मुंबईत राहायला असलेल्या ३० वर्षीय तरुणीने ही फिर्याद दिली आहे.

त्यानुसार कोतवालीचे पोलिस निरीक्षक प्रताप पांडुरंग दराडे (रा. अकोले, ता. इंदापूर, जि. पुणे) यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादीत म्हटले आहे की, दराडे यांनी ऑगस्ट २०२३ ते नोव्हेंबर २०२४ पर्यंत या तरुणाीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी वारंवार शारीरिक संबंध ठेवले. पालघर येथील फार्म हाऊस व तरुणीच्या घरातही असे कृत्य केले. अलीकडे दराडे यांनी तरुणीवर दबाव आणून तिला झाले गेले विसरून जाण्यास बजावले. सोडून जावे म्हणून धमकी दिली. तरुणीने पोलिसांत तक्रार करते, असे सांगितले असते काय करायचे ते कर असे सांगितले.

त्यामुळे तरुणीने नगरच्या तोफखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार दराडे यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. आणि कोतवालीच्या वादग्रस्त अधिकाऱ्यांच्या यादीत एकाची भर पडली.

 

 

 

 

 

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे