ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

आजच्या पिढीला (AI) ए.आय ॲप्लिकेशन वापराबाबत शिक्षण घेणे आवश्यक :- प्राचार्य डाॅ. प्रा. शंकर नवले

सोलापूर

महाराष्ट्र राज्य पद्मशाली संघमच्या वतीने प्रिसिजन इंग्लिश मेडी.स्कूल मध्ये ए.आय. तत्रज्ञानाचा शिक्षणात उपयोग करणे बाबत कार्यशाळा संपन्न झाले.

सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्रिसिजन इंग्लिश मेडियम स्कूलचे संस्थापक श्रीनिवास बुरा ,प्रमुख पाहूणे म्हणून सिंहगड काॅलेज ऑफ इंजिनिअरींग चे प्राचार्य डाॅ. प्रा.शंकर नवले, महाराष्ट्र राज्य पद्मशाली संघमचे प्रधानसचिव यशवंत इंदापुरे, ऑफीशियल विभाग संघमचे उपाध्यक्ष अविनाश संगा, इंजिनिअर विभाग संघमचे सचिव तथा प्रशिक्षक प्रशांत गाजूल, स्कूलचे प्रिन्सिपल सुनिल नवले आदी मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले.

प्रथम सर्व मान्यवरांचे हस्ते भारत माता प्रतिमेचे पुजन करून व्दिप प्रज्वलन करण्यांत आले. सदर प्रसंगी स्कूलच्या वतीने सर्व मान्यवरांचे बुके देऊन सत्कार करण्यांत आले.

याप्रसंगी प्राचार्य डाॅ.प्रा.शंकर नवले यांनी माणसांना जसे अन्न,वस्र आणि निवारा यांची आवश्यकता आहे तसे आताच्या पिढीला ए.आय. तंत्रज्ञान शिक्षण लहानपासूनच शिकणे अत्यंत गरजेचे आहे.त्यामुळे आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करावे असे सुचविले. श्रीनिवास बुरा यांनी ए.आय.च्या माध्यमातून शिक्षण घेतल्यास नक्की विद्यार्थ्यांना फायदा होईल असे सांगितले. अविनाश संगा यांनी मार्गदर्शन पर भाषणांत विद्यार्थ्यांना मोफत आधुनिक तंत्रज्ञान शिक्षण देणारे प्रशिक्षक प्रशांत गाजूल यांचे अभिनंदन करून आभार मानले.

यावेळी प्रशिक्षक प्रशांत गाजूल यांनी तीन तासाचे ए.आय मधील चाटजीपीटी, जेमिनी,ग्रो, डिपसिंक हे अॅप्स प्रोजेक्टरच्या सहाय्याने पीपीटी व्दारे विद्यार्थ्यांनी काळजीपूर्वक व सुरक्षितपणे कसे वापरावे हे सांगितले. तुमच्या अभ्यासात तुमचे शिक्षक म्हणून चाटजीपीटी च्या सहाय्याने इंग्रजी, गणित,विज्ञान यातील धडे अत्यंत सोप्या भाषेत समजावून घेता येते.ग्रो अप्लीकेशन व्दारे खेळातून शिक्षण घेता येते. हे एआय चे अॅप्लिकेलन्स शिक्षण सोपा करतो. पण आपण जे विचारतो त्याची माहिती खरे आहे का ? ते तपासायला हव. त्यासाठी पालकांची आणि शिक्षकांची मदत घ्यावे असे सुचविले.

या कार्यक्रमांस अनेक शिक्षक विद्यार्थ्यी उपस्थित होते. सदर प्रसंगी अनेक विद्यार्थ्यांनी विविध शंका व अनेक प्रश्न विचारले असता, समर्पक उत्तरे प्रशिक्षक प्रशांत गाजुल यांनी दिले.

शेवटी प्रधानसचिव यशवंत इंदापुरे यांनी सर्व उपस्थित मान्यवर, शिक्षक , विद्यार्थ्यी आणि स्कूलचे आभार मानले. शाळेतील शिक्षिका कांचन हुन्नुरे यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचलन केले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे