ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

संपादकीय

अहमदनगर जिल्ह्यातील सौ.श्रुती‌ बत्तीन -‌ बोज्जा यांना महाराष्ट्र लेडीरत्न पुरस्कार जाहीर

अहमदनगर

बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर येथील तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य सामाजिक संघटनेच्या वतीने मिडिया क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्यासाठी अहमदनगर जिल्ह्यातील सौ.श्रुती‌ बत्तीन -‌ बोज्जा यांना महाराष्ट्र लेडीरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

येत्या २६ जानेवारी २०२४ रोजी बुलढाणा मेहकर येथे आयोजित कार्यक्रमात सौ.श्रुती‌ बत्तीन -‌ बोज्जा यांना महाराष्ट्र लेडीरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

सौ.‌श्रुती बत्तीन बोज्जा AR न्यूज मिडिया मुख्य संपादिका न्यूज ऑनलाईन पोर्टल आणि यु ट्यूब च्या माध्यमातून खास महिलांसाठी खास डिजिटल व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. त्यांचे हे महिलांसाठी काम बघून अहमदनगर चे मा. श्री. भैय्या गंधे – मा भाजपा शहर जिल्हाध्यक्ष, विधान सभा निवडणुक प्रमुख, नगरसेवक तसेच पद्मश्री पुरस्कार प्राप्त निलिमा मिश्रा ताई यांच्या हस्ते श्रुती मॅडम चा सत्कार केला होता.

या मॅडम नी वेळोवेळी विशेष पुस्तिका प्रकाशित केले आहेत.. उदा.१५ ऑगस्ट , गणपती, नवरात्र, दिवाळी तसेच सामाजिक विषय घेऊन विशेष पुस्तिका प्रकाशित करण्याचा त्यांचा मानस आहे.तसेच आत्ता ६ आणि ७ जानेवारी रोजी यांनी महिलांसाठी शाॅपिंग फेस्टिव्हल आयोजित केले आहे.

या महिला व्यावसायिक जसे ब्युटीशियन, ड्रेपरी, केटरींग, ज्वेलरी मेकींग, टेलरिंग, म्युझीक क्लास, ड्रॉइंग क्लास, संस्कार वर्ग, कुकींग क्लास, डान्स क्लास, इंटेरियर डेकोरेशन अशा घरगुती व्यावसायिक महिलांना प्रकाशात आणणे, त्यांच्या जाहिराती व मुलाखती प्रसिद्ध करून त्यांच्या व्यवसायाला हातभार लावणे हा उद्देश आहे. AR न्यूज विविध क्षेत्रातील व्यवसाय प्रसिद्धी साठी महिलांचे एक हक्काचे व्यासपीठ आहे.

तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य सामाजिक संघटना बुलढाणा जिल्ह्यात आहे. त्यांना मिळालेल्या पुरस्काराने अहमदनगर जिल्ह्यातील परिसरातुन अनेक मान्यवरांनी त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे