ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

दिलखुलास गप्पामहाराष्ट्र

व्यवसाय करायला वय आडवे येत नाही तर जिद्द आडवी येते, जिद्द नसेल तर काहीच होऊ शकत नाही , जिद्द असेल तर एक इतिहास घडू शकतो- वामनप्रभा क्राफ्ट च्या संचालिका शिलांताईंशी दिलखुलास गप्पा

पुणे

व्यवसाय करायला वय आडवे येत नाही तर जिद्द आडवी येते , जिद्द नसेल तर काहीच होऊ शकत नाही, जिद्द असेल तर एक इतिहास घडू शकतो ….व्यवसाय करताना अनेक अडचणी आल्या त्यातून स्वतःचा ब्रँड कसा उभा केला …अपयशातून यशाकडे – वामनप्रभा क्राफ्टचा टाकाऊतून टिकाऊपर्यंतचा प्रवास ..

“ज्याच्याकडे कल्पकतेची नजर असते, त्याच्यासाठी टाकाऊ वस्तूदेखील संपत्ती ठरते!”हीच कल्पना मूर्त स्वरूपात उतरवणाऱ्या शीला विनायक तिखे यांचा प्रवास म्हणजे एक छोटंसं स्वप्न, अनेक अडचणी आणि त्यावर मात करत उभा राहिलेला एक प्रेरणादायी ब्रँड – ‘वामनप्रभा क्राफ्ट’ – शीला तिखे 

सुरुवात अशी गरजेतून कल्पनेचा उगम..सिंहगड रोडवरील सनसिटी, पुणे येथील एका छोट्याशा घरात, आर्थिक मर्यादा असताना, जुन्या वस्तूंना वापरून काहीतरी नवं घडवायची ओढ शीला ताईंना लहानपणापासून होती.मुलांची शाळा, घरखर्च, आणि वेळेचं भान सांभाळून त्यांनी जुन्या साड्यांतून साडी कव्हर, बॅग्स आणि पीशव्या तयार करत छोट्या प्रमाणावर विक्रीला सुरुवात केली.

अडथळे खुपच आलेच… पण थांबल्या नाहीत.प्रारंभी ग्राहक नव्हते, काहींनी हसून टाकलं – “जुना कापड वापरून कोण वस्तू विकतं?”कधी मटेरियलची कमतरता, कधी पैसे अडकले, कधी हाताशी मदत नव्हती…पण एक गोष्ट मात्र अढळ राहिली.हातातलं कौशल्य आणि मनातली न थांबणारी जिद्द.

कौशल्यावर विश्वास ठेवत बनवला स्वतःचा ब्रँड बनवला. हळूहळू कामात नाविन्य आणलं. जुन्या वस्तूंना आकर्षक रूप देणं, त्यात युटिलिटी आणणं, ग्राहकांच्या आवडीनुसार कस्टमायझड ऑर्डर्स तयार करणं.ह्यामुळे त्यांचा ब्रँड लोकांच्या नजरेस पडू लागला.

“प्रत्येक अडथळा ही एक संधी असते. जुनी वस्तू नव्यानं वापरता येते, तसंच अपयश देखील नव्या यशाची सुरुवात असते!” असे ताईंचे म्हणणे आहे..

आज ‘वामनप्रभा क्राफ्ट’ हे नाव पुण्यातच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्रात ओळखलं जातं..जिथे जुनं नव्या रंगात जगायला शिकतं.” ५०+ प्रकारच्या युटिलिटी वस्तू, एक कल्पक कलाविश्व ,पर्स, बटवे, पिशव्या,साडी कव्हर्स, तोरणं, गिफ्ट बॅग्ज,आणि असे ५० हून अधिक काटन प्रोडक्ट्स जे टिकाऊ, उपयोगी आणि पर्यावरणस्नेही आहेत.

आज त्यांचं काम फक्त शिलाईपुरतं मर्यादित नाही , तर त्यातून जागृती, शाश्वतता आणि प्रेरणा दिली जाते. सेवा आणि समाधान यांचा समतोल मिळुन  ग्राहकाच्या मागणीनुसार वस्तू तयार करणं, संपूर्ण महाराष्ट्रात कुरीयर सेवा,घरबसल्या ऑर्डरची सुविधा या गोष्टींमुळे ग्राहकांचा आत्मविश्वास वाढला आणि ‘वामनप्रभा क्राफ्ट’ एक विश्वासार्ह नाव बनलं.

संपर्कासाठी –  सौ. शीला विनायक तिखे –  8806657248

 

 

 

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे