ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

ब्युटीशियन महिलांनो  सावधान – अहिल्यानगर मध्ये मेहंदी, क्रिम विक्रीसाठी बाजारात आले..

अहिल्यानगर

अहिल्यानगरमध्ये नित्या कंपनीच्या नावाचे साधर्म्य असणारे बनावट मेहंदी व क्रीम विक्रीसाठी ठेवणाऱ्या तिघा दुकानदारांवर कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हे नोंदवले आहेत.

कारवाईत ५८ हजार ५७१ रुपयांचा बनावट माल जप्त केला. कंपनीचे तपासणी अधिकारी चेतन गणात्रा (वय ४६, निगडी, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांनी कोतवाली पोलिसांच्या पथकासह मार्केट यार्ड येथील जय बाबा कॉस्मेटिक्स, मोची गल्ली येथील लक्ष्मी कॉस्मेटिक्स, कॉस्मेटिक्स ॲण्ड लेडीज शॉपी या तीन दुकानात कारवाई केली.

या प्रकरणी केशव किशनचंद मोतीयानी (वय ६८, सोनानगर), प्रकाश वासुदेव सचदेव (वय ५०, रा. सावेडी), विशाल पुरण सांखला (वय ४४, रा. पारशा खुंट चौक) यांच्या विरोधात गुन्हा नोंदवला.

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे