ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

अहिल्यानगर महानगरपालिकेची गाळेधारकांवर जप्ती कारवाई सुरू

अहिल्यानगर

रंगभवन व्यापारी संकुलातील २० गाळेधारकांनी कारवाई टाळण्यासाठी भरले ४८.९६ लाख

वसुलीसाठी दिलेले धनादेश न वाटल्यास तत्काळ गाळा जप्त करून खटला दाखल करणार : आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे

अहिल्यानगर  महानगरपालिकेच्या मालकीच्या गाळ्यांच्या थकबाकी वसुलीसाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जप्ती मोहीम सुरू केली आहे. मार्केट विभागाच्या पथकाने गुरुवारी सहाय्यक आयुक्त सपना वसावा यांच्या नेतृत्वाखाली सर्जेपुरा येथील रंगभवन व्यापारी संकुलातील थकबाकीदार गाळेधारकांवर जप्ती कारवाईचा बडगा उगारतच २० गाळेधारकांनी थकीत रकमेचा धनादेश जमा केला आहे.

आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांच्या आदेशानुसार शहरातील महानगरपालिकेच्या गाळे, खोल्या, कार्यालये आदींकडे असलेल्या भाड्याच्या थकीत वसुलीसाठी मोहीम सुरू करण्यात आली आहे. थकबाकीदार गाळेधारकांना यापूर्वीच जप्ती कारवाईच्या नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. नोटीसीची मुदत संपल्यानंतर आता मार्केट विभागाकडून जप्ती कारवाई व वसुली मोहीम सुरू करण्यात आली आहे. गुरुवारी सहाय्यक आयुक्त सपना वसावा व मार्केट विभाग प्रमुख सतीश पुंड, वसुली लिपिक करण डापसे, संकेत कोतकर, राहुल झिंजे, शिवराम गवांदे, आसाराम गुंड, तुळशीराम जगधने, शिवाजी गाढवे यांच्या पथकाने सर्जेपुरा रंगभवन व्यापारी संकुलातील ३९ थकबाकीदारांपैकी २० गाळेधारकांवर कारवाईचा बडगा उगारला. या २० गाळेधारकांनी कारवाई टाळण्यासाठी ४८.९६ लाख रुपयांची थकबाकी धनादेशाद्वारे जमा केली आहे.

दरम्यान, महानगरपालिकेने सर्वच थकबाकीदार गाळेधारकांवर कारवाई सुरू केली आहे. सुमारे २५ कोटींची थकबाकी आहे. नोटीसा बजावूनही थकबाकी भरत नसतील तर आता कठोर कारवाई करण्याशिवाय महानगरपालिकेकडे पर्याय नाही. सर्व थकबाकीदारांना अनेकवेळा आवाहन करूनही प्रतिसाद मिळालेला नाही.

त्यामुळे जप्ती कारवाई सुरू करण्यात आली आहे. कारवाई टाळण्यासाठी तत्काळ थकीत भाडे जमा करावे, असे आवाहन करतानाच वसुलीवेळी दिलेले धनादेश न वाटल्यास तत्काळ गाळा ताब्यात घेऊन फौजदारी खटला दाखल केला जाईल, असा इशाराही आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी दिला आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे