ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

बाप्पांसोबत पुजारी, स्वयंसेवक अन् सुरक्षा रक्षक यांच्यासाठी घेतला विक्रमी 474 कोटींचा विमा, गणेश मंडळाचं अनोखं पाऊल

बाप्पांसोबत पुजारी, स्वयंसेवक अन् सुरक्षा रक्षक यांच्यासाठी घेतला विक्रमी 474 कोटींचा विमा, या गणेश मंडळाचं अनोखं पाऊल.

श्रावण महिना संपत आला असून गणपती बाप्पाच्या आगमनासाठी अवघे काही दिवस उरले आहेत. यंदा 27 ऑगस्ट रोजी गणेशाचे आगमन होणार आहे. संपूर्ण देशभरात, विशेषतः महाराष्ट्रात गणेशोत्सवाचा मोठा उत्साह आहे. मुंबईतील किंग्ज सर्कल येथील गौड सारस्वत ब्राह्मण (GSB) सेवा मंडळ नेहमीच सर्वात भव्य आणि श्रीमंत गणपतीची स्थापना करते. यावेळीही मंडळाने विक्रमी विमा घेऊन सर्वांचे लक्ष वेधले आहे.

या वर्षी जीएसबी मंडळाने त्यांच्या गणपतीसाठी तब्बल 474.4 कोटी रुपयांचे विमा कवच घेतले आहे जे गेल्या वर्षीच्या 400.8 कोटी रुपयांपेक्षा खूप जास्त आहे. गणपतीच्या मूर्तीला अर्पण केलेल्या सोने-चांदीच्या दागिन्यांची वाढलेली किंमत आणि कामाला असलेल्या सेवकांची वाढलेली संख्या यामुळे विम्याची रक्कम वाढली आहे. न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनीने हा विमा दिला आहे.

या प्रचंड विमा संरक्षणापैकी सर्वात मोठा भाग 375 कोटी रुपये, चाकर, स्वयंपाकी, सुरक्षारक्षक आणि इतर कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक अपघाताच्या विम्यासाठी आहे. यासोबतच 67 कोटी रुपयांचा विमा सोने-चांदीचे दागिने आणि इतर जोखमींसाठी घेतला आहे. मंडपात आग किंवा भूकंपासारख्या नैसर्गिक संकटांसाठी 2 कोटी रुपयांची विशेष पॉलिसी देखील घेतली आहे.

गेल्या वर्षी बाप्पाला 69 किलो सोन्याचे आणि 336 किलो चांदीचे दागिने घालण्यात आले होते. या वर्षी किती दागिन्यांनी मूर्ती सजवली जाईल ? हे अजून मंडळाने जाहीर केलेले नाही. जीएसबी सेवा मंडळाच्या गणेशोत्सवाचे यंदाचे हे 71 वे वर्ष आहे.

भाविकांच्या सुरक्षिततेसाठी मंडळाने मंडपात चेहऱ्याची ओळख पटवणारे कॅमेरे बसवले होते तसेच प्रवेशासाठी क्यूआर कोडची व्यवस्थाही केली होती.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे