ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

ICICI बँकेनंतर HDFC बँकेने ग्राहकांना दिला मोठा धक्का

आयसीआयसीआय बँकेपाठोपाठ आता एचडीएफसी बँकेनेही आपल्या ग्राहकांना मोठा झटका दिला आहे. दोन्ही प्रमुख खाजगी बँकांनी बचत खात्यावर किमान शिल्लक ठेवण्याची मर्यादा वाढवली आहे. हे नवीन नियम 1 ऑगस्ट 2025 पासून नवीन बचत खाते उघडणाऱ्या सर्व ग्राहकांना लागू झाले आहेत.

एचडीएफसी बँकेमध्ये आतापर्यंत बचत खात्यात किमान 10,000 रुपये ठेवावे लागत होते. पण 1 ऑगस्ट 2025 नंतर नवीन खाते उघडणाऱ्या ग्राहकांना ही मर्यादा वाढवून 25,000 रुपये करण्यात आली आहे. जर खात्यात यापेक्षा कमी रक्कम असेल तर बँक शुल्क आकारेल. हा नियम सर्व प्रमुख महानगरे आणि शहरी भागांमध्ये लागू करण्यात आला आहे.

त्याचप्रमाणे आयसीआयसीआय बँकेनेही मोठी वाढ केली आहे. या बँकेत आता नवीन बचत खाते उघडणाऱ्या ग्राहकांना किमान 50,000 रुपये ठेवावे लागतील. पूर्वी ही मर्यादा 10,000 रुपये होती. म्हणजेच आयसीआयसीआय बँकेने ही मर्यादा तब्बल 5 पटीने वाढवली आहे. जुन्या ग्राहकांसाठी सध्याचे नियम तसेच राहतील जोपर्यंत बँक त्यांना स्वतंत्रपणे माहिती देत नाही.

पगार खात्यांवर किंवा शून्य बॅलन्स खात्यांवर (BSBDA) या नियमांचा कोणताही परिणाम होणार नाही. एकीकडे अनेक सरकारी बँका किमान शिल्लक ठेवण्याचा नियम रद्द करत आहेत, तर दुसरीकडे खाजगी बँकांनी ही मर्यादा वाढवल्याने ग्राहकांमध्ये नाराजीचा सूर आहे.

 

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे