ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

महाराष्ट्रात तयार होणार नवीन महाबळेश्वर.. जाणून घ्या काय आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा प्लॅन

महाराष्ट्रात एक नवीन पर्यटन स्थळ विकसित होणार आहे. राज्यातील पश्चिम महाराष्ट्रात हे नवीन पिकनिक स्पॉट विकसित होणार असून यामुळे शेकडो गावांमध्ये नागरिकांना दिलासा मिळणार आहे.

महाराष्ट्रात एक नवीन पिकनिक स्पॉट तयार होणार आहे. खरंतर महाराष्ट्राला लाभलेले नैसर्गिक सौंदर्य, राज्याला लाभलेला ऐतिहासिक वारसा, येथील ऐतिहासिक वास्तू महाराष्ट्राच्या वैभवात भर घालतात. महाराष्ट्राचा इतिहास जेवढा गौरवशाली आहे तेवढेच महाराष्ट्रातील नैसर्गिक सौंदर्य सुद्धा अद्भुत आहे. कारण की आता महाराष्ट्राच्या नकाशावर लवकरच एक नवे आणि आकर्षक ठिकाण विकसित केले जाणार आहे.

राज्यात तयार होणारे हे नवीन पर्यटन स्थळ फारच अद्भुत राहणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार राज्य सरकारकडून महाबळेश्वरप्रमाणेच निसर्गसंपन्न आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण असे “नवीन महाबळेश्वर” तयार केले जाणार आहे. हे हिल स्टेशन उभारण्याचे काम सध्या अगदीच युद्धपातळीवर सुरू आहे. दरम्यान या प्रकल्पाचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकताच आढावा घेतला आहे.

हे नवीन पर्यटन स्थळ राज्य रस्ते विकास महामंडळाकडून म्हणजेच एमएसआरडीसीकडून हा प्रकल्प उभारण्यात येत असून महाबळेश्वरच्या पायथ्याला हे नवीन पर्यटन स्थळ विकसित करण्यात येणार अशी माहिती देण्यात आली आहे. या प्रकल्पाबाबत बोलायचं झालं तर या प्रकल्पात पूर्वी 235 गावे समाविष्ट होती, परंतु आता त्यात वाढ करून 294 गावे या विकास आराखड्यात जोडण्यात आली आहेत, अशी माहिती संबंधितांकडून देण्यात आली आहे. विशेष म्हणजे सातारा जिल्ह्यात विकसित होणारे हे पर्यटन स्थळ 1,15,330 हेक्टर क्षेत्रात साकारण्यात येणार आहे. यामुळे सातारा जिल्ह्याच्या पर्यटनाला आणखी एक नवीन दिशा मिळणार आहे. जिल्ह्यातील पर्यटन यामुळे वाढणार आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी या प्रकल्पाचा आढावा घेतला आणि तापोळा येथील उत्तेश्वर मंदिर, उत्तेश्वर रोप वे, तसेच परिसरातील विविध पर्यटन कामांची माहिती घेतली आणि त्यास गती देण्याचे निर्देश दिले आहेत. त्यांनी एमएसआरडीसीला दर्जेदार आणि वेळेत काम पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पात सहभागी होण्याचे आवाहनही केले आहे. हा प्रकल्प एकाच टप्प्यात पूर्ण केला जाणार नाही. हा प्रकल्प एकूण चार भागांत विभागण्यात आला आहे.

उत्तरेकडील महाबळेश्वर, उत्तर पश्चिमेतील जावळी, पूर्वेचा सातारा, आणि दक्षिणेतील पाटण अशा चार भागांमध्ये हा प्रकल्प विभागण्यात आला आहे. येथील निसर्गसौंदर्याचा लाभ पर्यटकांना मिळावा यासाठी बोटिंग, स्कूबा डायव्हिंग, वॉटर स्पोर्ट्स, स्टे होम, अशा उपक्रमांची आखणी करण्यात आली आहे आणि यामुळे नवीन महाबळेश्वर पर्यटकांसाठी एक प्रमुख आकर्षणाचे केंद्र ठरू शकते.

हा प्रकल्प समुद्रसपाटीपासून 1200 मीटर उंचीवर सह्याद्रीच्या कुशीत उभारला जाणार आहे. या नव्या प्रकल्पामुळे महाराष्ट्राच्या पर्यटनात नवा अध्याय जोडला जाईल, नक्कीच राज्याच्या एकात्मिक विकासासाठी हा प्रकल्प सुद्धा महत्त्वाचा राहणार आहे.

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे