ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

अहिल्यानगरमध्ये व्यावसायिकाचे चौघांनी कारमध्ये अपहरण करून १ लाख ६० हजाराला लुटले

अहिल्यानगर

व्यावसायिकाला रस्त्यात चारचाकी गाडी आडवी लावून बळजबरीने त्या कार मध्ये बसवून निर्जनस्थळी नेवून त्याच्या फोन पे मधून १ लाख ४० हजार आणि खिशातील २० हजार रुपये काढून घेतल्याची घटना नगर एमआयडीसी परिसरातील साईबन रोड वर घडली.

या प्रकरणी चौघाजणांच्या विरोधात एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून यातील एका आरोपीला पोलिसांनी २३ जुलै रोजी अटक केली आहे.

या बाबत सुरेश सखाहारी म्हसे (वय ४३, रा.डेअरी चौक, शेंडी बायपास पाण्याची टाकी, ता.नगर) यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांचा शिलाई मशीनचा व्यवसाय असून ते ६ जुलै रोजी सकाळी ११.३० वाजता साईबन रोडने जात असताना त्यांना स्वप्नील व्यंकटेश मेहेत्रे, हर्षद गौतम गायकवाड, विश्वजीत वसंत माने (तिघे रा. वडगावगुप्ता, अ.नगर) व वैभव गौतम गायकवाड यांनी रोडवर चारचाकी गाडी आडवी लावुन, आडवुन त्यांना बळजबरीने गाडीत बसवुन पुढे निर्जन स्थळी नेले. त्यानंतर फिर्यादीच्या ओप्पो कंपनीचे मोबाईल मधुन फोन पे वरुन १ लाख ४० हजार रुपये फिर्यादीकडुन बळजबरीने स्वप्नील मेहेत्रे याचे फोन पे अकाउंटवर ट्रान्सफर करुन घेतले. तसेच फिर्यादीच्या खिशातील २० हजार रुपये काढून घेऊन तू जर या प्रकाराबाबत कोणाला काही सांगितले तर तुला व तुझ्या कुटुंबाला जिवे ठार मारुन टाकू असा दम दिला. तसेच तिघांनी मिळून फिर्यादीस लाथाबुक्क्याने मारहाण करुन गाडीचे खाली ढकलुन दिले. या मारहाणीत फिर्यादी हे जखमी झाले.

या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात सुरेश म्हसे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन स्वनिल मेहेत्रे, हर्षद गायकवाड, विश्वजीत माने व वैभव गायकवाड यांच्याविरुद्ध बी एन एस ११८ (२) ११९ (१) १२६ (२), ११५ (२). ३५२. ३५१ (२) प्रमाणे तिघांविरुद्ध गुन्हा केला.

गुन्हा दाखल झाल्यावर पोलिसांनी स्वनिल मेहेत्रे यास अटक केली आहे. अधिक तपास पोलीस हवालदार टेमकर हे करीत आहेत.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे