ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

जिममध्ये उशिरा आला म्हणून तरुणास फरशीवर आपटले..

जिममध्ये तू उशिरा का आलास असे म्हणत तरुणास जीममध्येच उचलून फरशीवर आपटले. या घटनेत सदर तरुणाच्या डोक्याला मार लागल्याने तो गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर जामखेड येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी एका जणांविरोधात जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की दि. ३० मे रोजी सायंकाळी ५.३० वा. जामखेड शहरातील एका जीममध्ये फिर्यादी सलमान सुलेमान शेख (वय २९ वर्ष), हा नेहमी प्रमाणे व्यायाम करण्यासाठी आला होता. यावेळी या ठिकाणी आरोपी सागर दत्तात्रय मोहळकर हा जीममध्ये आला व फिर्यादीस म्हणाला की तू जीममध्ये उशीरा का आलास असे म्हणून शिवीगाळ करण्यास सुरवात केली.

त्यावेळी फिर्यादी हा त्यास समजावून सांगत असताना त्यांने त्याला गालावर चापट मारली व जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने त्याच्या कंबरेला धरुन वर उचलून डोक्यावर व मानेवर फरशीवर आपटले. यामध्ये सलमान शेख याच्या डोक्याला व दोन्ही बरगडीला व पायाला गंभीर दुखापत झाली.

याप्रकरणी आरोपी सागर दत्तात्रय मोहळकर याच्या विरोधात दि ३ जून रोजी जामखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदकुमार सोनवलकर हे करत आहेत.

आरोपीने मारहाण का केली याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. मात्र तो नशेत होता का? का आणखी काही कारण आहे याची चौकशी होणे गरजेचे आहे. कारण जामखेड परिसरात अनेक तरुण उत्तेजक नशेच्या आहारी गेलेले आहे. नशेच्या धुंदीत मोठ्या प्रमाणात दहशत माजवली जाते यातून अनेक दुर्दैवी घटना घडतात असे नागरिकांचे म्हणणे आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे