ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

अहमदनगर मनपा आयुक्त पदाचा कार्यभार अतिरिक्त आयुक्तांकडे, नगर विकास विभागाचे आदेश

अहमदनगर

नगर महापालिकेच्या आयुक्त पदाचा अतिरिक्त कार्यभार अतिरिक्त आयुक्त सौरभ जोशी यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. आयुक्त डॉ. पंकज जावळे सध्या कार्यालयात उपस्थित नसल्याने प्रशासकीय सोयीच्या दृष्टीने हा कार्यभार सोपवण्यात आल्याचे नगर विकास विभागाने स्पष्ट केले आहे.

बांधकाम परवानगी देण्यासाठी एका बांधकाम व्यवसायिकाला आठ लाख रुपयांची लाच मागितल्या प्रकरणी आयुक्त पंकज जावळे, तसेच स्वीय सहायक शेखर देशपांडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 27 जूनपासून आयुक्त जावळे व देशपांडे दोघेही पसार आहेत.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून या कारवाईचा अहवाल शनिवारी नगरविकास खात्याकडे पाठवण्यात आला होता. नगरविकास खात्याने सोमवारी सायंकाळी आयुक्त जावळे यांचा कार्यभार अतिरिक्त आयुक्त जोशी यांच्याकडे सोपवला आहे.

आयुक्त जावळे हे सध्या कार्यालयात उपस्थित नसल्याने महापालिकेच्या कामकाजावर परिणाम होऊ नये, यासाठी प्रशासकीय सोयीच्या दृष्टिकोनातून हा कार्यभार सोपविण्यात आल्याचे आदेशात म्हटले आहे.

दरम्यान, लाच मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर अद्याप नगर विकास विभागाकडून जावळे यांच्यावर कारवाई झालेली नसल्याचे या पत्रातून स्पष्ट होत आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे