ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्रसामाजिक

आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने आज तिरंगा फाउंडेशन व एस फिटनेस यांच्या संयुक्त विद्यमाने वाडिया पार्क येथील पायऱ्यांवर योगा करून “जागतिक योगा डे” मोठ्या आनंदात साजरा करण्यात आला..

अहिल्यानगर

सध्याच्या धावपळीच्या जीवनात व्यायामाचे अनन्यसाधारण महत्व असून रोज मनुष्याने स्वतःचे आरोग्य हे सुदृढ ठेवण्यासाठी व आंनदीमय जीवन जगण्यासाठी दिवसातील एक ते दीड तास राखून ठेवावा योग व सूर्यनमस्कार करून रोगमुक्त जीवन जगावे असे आवाहन तिरंगा ग्रुप चे वतीने संभाजी राजे कदम यांनी केले.

आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने आज तिरंगा फाउंडेशन व एस फिटनेस यांच्या संयुक्त विद्यमाने वाडिया पार्क येथील पायऱ्यांवर योगा करून “जागतिक योगा डे” मोठ्या आनंदात साजरा करण्यात आला त्यामध्ये योगा व सूर्यनमस्कार करण्यात आले..

प्रथितयश योगशिक्षक किशोर फिरोदिया, सुनिता वाघ, श्याम वाघुंबरे व सायली परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली आजचा योगा डे मधील सर्व योगा करण्यात आले यात विविध योगा प्रकार व 108 सूर्यनमस्कार करण्याचा सर्व सदस्यांनी सहभाग नोंदवला.

यामध्ये संभाजी राजे कदम, अतुल डागा, धनेश खती, आकाश भन्साळी, संकेत खोसे पाटील, सुबोध बोथरा, दिनेश भाटिया, ललित लूनिया, अतुल शेटिया, स्वप्नील गांधी, दीपक कासवा, महेश चव्हाण, विद्या दाभाडे, संतोष तनपुरे, विनोद सांडीम, संदीप मुळे वीरेंद्र संकलेचा, कमलेश फिरोदिया, राहुल मुथा, पियुष कांकरिया, बाजीराव बोटे, योगेश बजाज, शुभम शिंदे, संतोष चंगेडिया, डॉ. रोहित गांधी, भरत चुडीवाल प्रवीण बेंद्रे, नितीन शिरसागर, राहुल मोटा, तेजस डागा, संग्राम सारडा या सर्व तिरंगा फाउंडेशनच्या सदस्यांनी यात सक्रिय सहभाग नोंदवला..

तिरंगा ग्रुपचे सर्व सदस्य हे अनेक वर्षांपासून वाडिया पार्क येथे नित्यनियमाने व्यायाम व योगा करत असतात निश्चितच याचा फायदा अनेक सदस्यांना होत असल्याचे मनोगत तिरंगा फौंडेशनच्या सदस्यांनी यावेळी व्यक्त केला.

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे