ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्रसामाजिक

सिताबाई थिटे कॉलेज ऑफ फार्मसी, शिरूर येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

शिरूर

श्री छत्रपती संभाजी शिक्षण संस्थेच्या सिटाबाई थिटे कॉलेज ऑफ फार्मसी, शिरूर येथे आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून एक दिवसीय योग कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. ‘योगा फॉर वेलनेस’ या संकल्पनेवर आधारित या कार्यशाळेमुळे विद्यार्थ्यांमध्ये आणि कर्मचाऱ्यांमध्ये योगविषयी जागरूकता वाढली व शारीरिक व मानसिक आरोग्याचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.

कार्यक्रमाची सुरुवात पारंपरिक पद्धतीने योग प्रार्थनेने करण्यात आली. प्रमुख मार्गदर्शक म्हणून कॉलेजचे प्राचार्य डॉ. सचिन कोठावदे सर आणि डी. फार्मसीचे प्राचार्य डॉ. अमोल शहा सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्यांचे विचार विद्यार्थ्यांना आरोग्य आणि शिस्तबद्ध जीवन शैलीविषयी प्रेरणा देणारे ठरले.

कार्यशाळेत प्रा. प्रेरणा मोटे व प्रा. विद्या पाचर्णे यांनी विद्यार्थ्यांना व शिक्षकांना विविध योगासने, प्राणायाम तंत्रे आणि ध्यान प्रक्रियेचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केले. राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी प्रा. विद्या पाचर्णे यांनी सुत्रसंचालन करत कार्यक्रमाला आकर्षक दिशा दिली, तर डी. फार्मसी विभागाचे राष्ट्रीय सेवा योजना प्रमुख प्रा. विशाल कारखिले यांनी मनपूर्वक आभारप्रदर्शन केले.

या कार्यशाळेत महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी सहभागी झाले होते. सर्व सहभागींचा योगाभ्यासात उत्स्फूर्त सहभाग दिसून आला.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. राजेंद्रजी थिटे, सचिव श्री. धनंजयजी थिटे, डॉ. हर्षवर्धनजी थिटे आणि संस्थेचे समन्वयक श्री. शिवाजीराव पडवळ यांनी सर्व सहभागी आणि आयोजकांचे विशेष अभिनंदन करून विद्यार्थ्यांच्या प्रयत्नांचे कौतुक केले.

ही कार्यशाळा म्हणजे केवळ एक आरोग्य उपक्रम नव्हे, तर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने एक महत्त्वाचा टप्पा ठरली आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे