ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

सेंट विवेकानंद स्कूलच्या प्रांगणात विद्यार्थ्यांचे जंगी स्वागत करण्यात आले.

अहिल्यानगर

अहमदनगर सिंधी एज्युकेशन सोसायटीच्या सेंट विवेकानंद इंग्लिश स्कूलमध्ये विद्यार्थ्यांचे अतिशय उत्साहात व जल्लोषात स्वागत करण्यात आले. उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर शाळेत येण्याचा आनंद विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर झळकत होता. २०२५-२०२६ या नवीन शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यासाठी शाळा सज्ज होती. याप्रसंगी शाळेत विविध प्रकारची सजावट करण्यात आली होती. संपूर्ण शालेय परिसर, वर्ग खोल्या सजवून सुशोभित करण्यात आल्या होत्या.

संस्थेचे सचिव श्री. गोपाल भागवानी, सेक्रेटरी दामोदर माखिजा माध्यमिकच्या प्राचार्या गीता तांबे, प्राथमिकच्या प्राचार्या सौ. कांचन पापडेजा तसेच सर्व शिक्षकवृंद शाळेच्या प्रवेशद्वाराजवळ विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यासाठी उपस्थित होत्या. या प्रसंगी सर्व विद्यार्थ्यांचे फुलांच्या वर्षावात व बिस्कीट वाटप करून स्वागत करण्यात आले. आपल्या शिक्षिका तसेच आपले मित्र-मैत्रिणी यांना भेटून विद्यार्थी अतिशय आनंदित झाले होते. विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यासाठी शिक्षिकांनी विद्यार्थ्यांसाठी स्वागत गीत सादर केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.चांदणी सोनाग्रा व शिरीन शेख यांनी केले .पूर्वप्राथमिक व इयत्ता पहिलीतील नव्याने प्रवेश केलेल्या बालचिमुकल्यांचे स्वागत करण्यासाठी सुंदर असा  स्टॅन्ड बनवण्यात आला होता. या सेल्फी स्टॅन्ड मध्ये विद्यार्थ्यांनी फोटो काढण्याचा आनंद लुटला.

तसेच पूर्व प्राथमिकच्या विद्यार्थ्यांनी शाळेच्या पहिल्या दिवसाची आठवण म्हणून आपल्या हाताचे ठसे उमटवण्याच्या उपक्रमात सक्रिय सहभाग घेतला.

प्राथमिकच्या प्राचार्या सौ. कांचन पापडेजा यांनी विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक वर्षासाठी शुभेच्छा देत शिस्त व नियमितपणा अंगीकारण्याचा मंत्र सांगितला.

तसेच शाळेच्या प्राचार्या गीता तांबे यांनी मुलांना या वर्षात नवीन संकल्प करून आपली शैक्षणिक प्रगती कशी साधता येईल याविषयी मार्गदर्शन केले.

संस्थेचे अध्यक्ष श्री. राम मेंघानी तसेच सचिव श्री. गोपाल भागवानी यांनी विद्यार्थ्यांना नवीन वर्षात उत्तरोत्तर प्रगतीसाठी शुभेच्छा दिल्या.

संस्थेचे अध्यक्ष श्री. राम मेंघानी, उपाध्यक्ष श्री. रूपचंद मोटवानी, सचिव श्री. गोपाल भागवानी, खजिनदार श्री. दामोधर माखिजा, विश्वस्त श्री. महेश मध्यान, श्री. सुरेश हिरानंदानी, श्री. राजकुमार गुरुनानी व श्री. हरेष मध्यान यावेळी विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यासाठी उपस्थित होते.

या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे