ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

अहिल्यानगर शहरामध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा कहर

बोल्हेगाव परिसरात जोरदार वादळी वाऱ्यासह पावसाचा कहर, जनजीवन विस्कळीत..लाईटचे पोल, तारा तुटून रस्त्यावर अक्षरशा झाडे कोलमडून पडली..

आमदार संग्राम जगताप यांच्या तत्परते मुळे बोलेगावातील आपत्कालीन परिस्थितीतील कामे तातडीने मार्गी – माजी सभापती कुमारसिंह वाकळे..

अहिल्यानगर शहरामध्ये सायंकाळी आठच्या सुमारास वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावल्यामुळे बोल्हेगाव परिसरामध्ये अक्षरशा मोठमोठी झाडे रस्त्यावर कोलमडून पडली त्यामुळे लाईटचे पोल, तारा रस्त्यावर तुटुन पडल्या असल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले, मनपा स्थायी समितीचे माजी सभापती कुमारसिंह वाकळे यांनी तातडीने घटनास्थळी दाखल होत परिस्थितीची पाहणी केली व शहराचे आमदार संग्राम जगताप यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधत परिस्थितीची माहिती दिली त्यानंतर आमदार संग्राम जगताप यांनी तातडीने महापालिका आपत्कालीन विभागाशी संपर्क साधत अधिकारी कर्मचारी यांना घटनास्थळी पाठवले.

माजी सभापती कुमारसिंह वाकळे म्हणाले, वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसात रस्त्यावर मोठमोठे झाडे पडली होती ते तातडीने काढण्याचे काम केले त्यामुळे नागरिकांचे जनजीवन पूर्वपदावर येण्यास मदत झाली, गावातील युवकांनी भर पावसात आपत्कालीन परिस्थिती मधील कर्मचाऱ्यांना मदत केली . तसेच आमदार संग्राम जगताप यांच्या तत्परतेमुळे बोल्हेगावातील आपत्कालीन परिस्थितीतील कामे तातडीने मार्गी लागत नागरिकांना दिलासा देण्याचे काम केले असे त्यंनी सांगितले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे