ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

सहजयोग ध्यान साधने मुळे आत्मिक शांतता लाभते- सचिन जगताप

प. पु. माताजी श्री निर्मला देवी यांचा मेघा पब्लिक प्रोग्राम संपन्न..

प. पु. माताजी श्री निर्मला देवी यांच्या परम कृपेत जॉगिंग ट्रॅक मैदान सावेडी येथील सहजयोग ध्यान साधनेची माहिती व कुंडीलिनी शक्ती जागृतीच्या कार्यक्रम प्रसंगी महाराष्ट्र राज्य सहजयोग प्रचार प्रसार टीम चे प्रचारक प्रा. नितीन पवार, मा. जि. प. सदस्य सचिन जगताप, मा. महापौर बाबासाहेब वाकळे,मा. सभापती सचिन जाधव, नगरसेवक अजिंक्य बोरकर, डॉ. सागर बोरुडे, अमोल यावलकर, मेजर कुंडलिक ढाकणे, रावसाहेब भोपळे , कोकरे साहेब, ताजणे साहेब, दैनिक ध्येय, बीड चे उपसंपादक उमा चव्हाण, अमित बुरा व मा. जिल्हा समन्वयक श्रीनिवास बोज्जा आदी उपस्थित होते.

या वेळी बोलतांना सचिन जगताप म्हणाले आजच्या ताण तणावाच्या दुनियेत ध्यान साधनेची प्रत्येकाला फार गरज आहे. सहजयोग ध्यान साधना ही आंतरराष्ट्रीय स्तरावर असून ही ध्यान साधना नियमित केल्यामुळे आंतरिक शांती मिळते याचा अनुभव मी घेतलेला असून प्रत्येकाने सहजयोग ध्यान साधना अंगीकारावी असे आवाहन केले.

कार्यक्रमाचे सुरुवातीस अमरावती येथील आंतरराष्ट्रीय संगीतकार संदीप दलाल व मिलिंद दलाल यांनी आपल्या संगीताने उपस्थितांना मंत्र मुग्ध केले. आलेल्या सर्व पाहुण्यांचे व उपस्थित सर्व साधकांचे अहिल्यानगर सहजयोग परिवाराचे वतीने मा. जिल्हा समन्वयक श्रीनिवास बोज्जा यांनी स्वागत केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अशोक तरकसे यांनी केले.

कार्यक्रमाची माहिती देतांना प्रा. नितीन पवार म्हणाले सहजयोग ध्यान साधनेचा फायदा लहान मुलापासून तरुण व वयोवृद्धा पर्यंत सर्वांना होतो. हा योग कुटुंबातील सर्वानी एकत्रित बसून करता येणारा योग आहे, या ध्यान साधनेमुळे प्रत्येक मानवाला सुखी व आनंदी जीवन जगता येते. आज भारतासह जगातील 140 देशापेक्षा जास्त देशातील नागरिकांनी सहजयोग ध्यान साधना प्राप्त केली असून त्या ठीकाणी आज पावेतो विनसायास ध्यान साधना चालू आहे.

कार्यक्रमाची सुरुवात भव्य रॅली ने करण्यात आली असून या रॅली मध्येदोन लाईटिंग केलेले रथ,चार घोडे, दोन उंट, मोठे बँड पथक हलगीवाले, ट्रॅक्टर ट्रॉली व या मध्ये वेशभूषा केलेले श्री गणेशजी, हनुमान जी, श्री सिताराम, श्री शिव पार्वती, लक्ष्मण, महालक्ष्मी महासरस्वती, महाकाली, भारत माता घोड्यावरती स्वार झालेले श्री छत्रपती शिवाजी महाराज, झाशीची राणी, अहिल्याबाई होळकर व मॉं जिजाऊ असे असंख्य पात्र पोशाखात उभे होते. या रॅली चे विशेष आकर्षण म्हणजे अहिल्यानगर येथील सहजयोगी महिलांनी अनेक दिवस परिश्रम करून जो लेझीमचा डाव बसवला तो अप्रतिम होता या लेझीम डाव साठी शुभम भालदंड सर यांनी अथक परिश्रम घेतले. रॅली मध्ये मशाल धरणारे जेष्ठ सहजयोगी, श्रीमाताजींची प्रतीमा ठेवलेले रथ तसेच माताजींच्या चरणाची पालखी असे मोठया प्रमाणात सहजयोगी संपूर्ण महाराष्ट्रातून उपस्थित होते. कार्यक्रमाचे ठिकाणी भव्य एल ई डी स्टेज वर होता तर साधकांसाठी दोन्ही बाजूला दोन एल ई डी लावण्यात आले होते, स्टेज वर सिंहासनावर प. पु. माताजींची मोठी प्रतिमा होती. संपूर्ण मैदानात प्रचंड प्रकाश होता अशा या संपूर्ण मेगा पब्लिक प्रोग्राम चे आयोजन मोहोळ, सोलापूर येथील अमोल यावलकर, नाशिक येथील सुमित अहिरे, लोणी येथील अमोल अभंग, संगमनेर येथील मनोज वाकचौरे यांच्या सह अहिल्यानगर येथील वसंत गायकवाड सर, उत्तम बेरड, चंद्रकांत रोहोकले,विनायक जोग, पंतम काका, संदीप गांगर्डे, शुभम,नितीन देवळालकर, गजेंद्र सांगळे, मनोज बोज्जा, मनोहर म्याना,अविनाश आडेप, लक्ष्मण अंदे, गणेश कोडम, अशोक कराळे, राजू मंचे, राजू द्यावनपेल्ली, रवींद्र आगरकर, मनोज चव्हाण, बालाजी मेरगू, विशाल संभार, कार्तिक ढाकणे, अथर्व बोज्जा, धनंजय ढाकणे, अमर बुरा तसेच स्त्री शक्ती म्हणून जयश्री सामलेटी, वीणा बोज्जा, किरण येनगंदुल, सुनीता शिदे, सुलभा सोलट, वासंती वैद्य सह अनेक महिलांनी परिश्रम घेतले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुमित अहिरे यांनी केले तर शेवटी आभार अमित बुरा यांनी मानले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे