ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

नांदेडचे ५५ माजी नगरसेवक भाजपात

नांदेड-वाघाळा महानगरपालिकेच्या ५५ निर्वाचित आणि स्विकृत नगरसेवकांनी माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे.

स्वतः चव्हाण यांनीच शनिवारी दुपारी समाजमाध्यमांवर फोटो आणि प्रतिक्रिया पोस्ट करून नांदेडच्या राजकारणातली ही मोठी बातमी समोर आणली. त्यानंतर विधानपरिषदेचे माजी गटनेते अमरनाथ राजूरकर यांनी याविषयी विस्तृत माहिती देताना सांगितले की, अशोकराव चव्हाण यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्यानंतर नांदेड-वाघाळा महानगरपालिकेच्या ५२ माजी नगरसेवकांनी त्यांच्याशी संपर्क साधून पाठिंबा दिला होता.

चव्हाण यांचे नांदेडला आगमन झाल्यानंतर कालपासून अनेक नगरसेवकांनी निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. तर, काही नगरसेवकांनी आज झालेल्या एका बैठकीत भाजपला समर्थन देत असल्याचे जाहीर केले. चव्हाण यांच्या उपस्थितीतच या नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, खा. अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आतापर्यंत निवडून आलेले व स्विकृत मिळून एकूण ५५ नगरसेवक भाजपमध्ये सामिल झाले आहेत.

नांदेड-वाघाळा महानगर पालिकेच्या मागील निवडणुकीत अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे ८१ पैकी ७३ नगरसेवक निवडून आले होते. पुढील काळात त्यातील आणखी काही नगरसेवक भाजपामध्ये प्रवेश करतील, असेही सूतोवाच अमरनाथ राजूरकर यांनी केले आहे.

दरम्यान, अशोकराव चव्हाण यांनी समाजमाध्यमांवर पोस्ट करून भाजपामध्ये प्रवेश करणाऱ्या नगरसेवकांचे स्वागत आणि अभिनंदन केले.

नांदेड-वाघाळा महानगरपालिकेच्या मागील कार्यकाळातील नगरसेवकांशी आज विस्तृत चर्चा झाली. सुमारे ५५ हून अधिक माजी निर्वाचित नगरसेवक आणि स्वीकृत सदस्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून विकासाच्या मुख्य प्रवाहात सहभागी होण्याचा निर्णय घेतला, असे चव्हाण यांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केले आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे