ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्रसामाजिक

कै.महेश कोठे जयंती निमित मोफत आरोग्य तपासणी आणि औषधोपचार कार्यक्रम संपन्न

सोलापूर

सोलापूर  येथील पद्मशाली समाज सेवा निवृत्त संघाचे वतीने कै.महेश कोठे जयंती निमित्त मोफत आरोग्य तपासणी आणि औषध वाटप कार्यक्रम संघाचे अध्यक्ष श्रीहरी कुरापाटी यांचे अध्यक्षतेखाली आणि प्रथमेश दादा कोठे यांचे हस्ते तसेच नगरसेवक सतीश सिरसिल्ला, नगरसेवक युवराज सरवदे,मिनाक्षी कडगंची , नगरसेवक दिपिका यलदंडी, वासुदेव यलदंडी ,अविनाश दासरी, नागनाथ बोड्डू यांचे उपस्थितीत संपन्न झाले.

प्रथम श्रीनिवास कोडम यांनी सर्व पाहूण्यांचे स्वागत करून प्रस्तावनेत संघाचे माहिती दिली. त्यानंतर श्री धन्वंतरी देवतेची पुजन आणि कै.महेश कोठे यांचे प्रतिमेचे पुजन मान्यवरांचे हस्ते करण्यांत आले. तसेच व्दिप प्रज्वलन करण्यांत आले. यावेळी सर्व मान्यवरांचे शाल आणि बुके देऊन सत्कार करण्यांत आले.या प्रसंगी सेवानिवृत्त संघाचे वतीने वधुवर केंद्रा साठी घरकूल भागात हाॅल मिळणेसाठी प्रथमेश कोठे यांना निवेदन देण्यांत आले.

सदर प्रसंगी प्रथमेश दादा कोठे यांनी मार्गदर्शन पर भाषणांत हाॅल मिळवून देण्यांचे आश्वासन दिले. तसेच सेवानिवृत्त संघाचे कामकाज पाहून समाधान व्यक्त केले. सतिश सिरसिल्ला यांनी सेवानिवृत्त संघाचे कौतुक केले. तर वासूदेव यलदंडी यांनी संघाचे कामकाज हे युवा पिढीला मार्गदर्शक असल्याचे सांगितले.

या शिबीरामध्ये 122 जणांनी आरोग्य तपासणी करून घेतले आणि मोफत औषधोपचार घेतले. सदर कार्यक्रम यशस्वी होणेसाठी सचिव यशवंत इंदापुरे, खजिनदार उमापती मिठ्ठापल्ली, देविदास मेरगू आणि सुशिलकुमार चिलका यांनी परिश्रम घेतले. तर या कार्यक्रमांस सहसचिव सत्यनारायण बरदेपूर, कार्यकारी सदस्य संगीता इंदापुरे,अरूणा कन्ना, श्रीनिवास वल्लाकाटी, अनिलकुमार जन्यारम , प्रशांत गाजूल, राजेश मामड्याल, डाॅ.सौंदर्या गोरट्याल आणि डाॅ.अर्चना मिरजकर , विवेकानंद श्रीपती.यांचे सहकार्य लाभले.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभार उपाध्यक्ष अनिल कन्ना यांनी मांडले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे