मेहकर येथे भव्य नँशनल व राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन
अहिल्यानगर प्रतिनिधी - संगीता खिलारी. तथागत ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष संदिप गवई..

मेहकर – तथागत बहुउद्देशीय संस्था, मेहकर द्वारे आयोजित राजमाता माँ जिजाऊ स्वयंसहायता महिला बचत गट, जिवन दिप अनाथ आश्रम व वृध्दाश्रम तसेच तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील कर्तृत्ववान बंधू व भगिनींना, तसेच युवक युवतींनचा नँशनल पिपल लीडरशीप अँवॉर्ड, राजमाता माँ.जिजाऊ गौरव सन्मान पुरस्कार, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे समाजभूषण पुरस्कार देवून सन्मान करण्यात येणार आहे. आशी घोषणा तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदिपभाऊ गवई यांनी केली आहे.
येत्या दि.09/03/2025 रोज रविवार ला वेळ सकाळी 11:30 वाजता स्थळ डॉ बाबासाहेब आंबेडकर वाटिका अशोका भवन येथे आयोजीत करण्यात आला आहे .
नँशनल पिपल लीडरशीप अँवॉर्ड, राजमाता माँ.जिजाऊ गौरव सन्मान, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे समाजभूषण पुरस्कार देण्यात येत आहे. व माजी सैनिक सन्मान तसेच नागरी सत्कार समारंभ ठेवण्यात आला आहे.
आशाच महाराष्ट्रातील विवीध क्षेत्रामध्ये चांगले काम करणार्या बंधू व भगिनींना, तसेच युवक युवतींना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने हा पुरस्कार सोहळा राबविण्यात येणार आहे. नँशनल पिपल लीडरशीप अँवॉर्ड, राजमाता माँ.जिजाऊ गौरव सन्मान पुरस्कार, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे समाजभूषण पुरस्काराचे गावपातळीवर मेहकर येथे वितरण होणार आहे.
यामध्ये सन्मानपत्र, सन्मानचिन्ह ट्राफी, मेडल, पंचरंगीदुपट्टा, असे या पुरस्काराचे स्वरूप ठेवण्यात आले आहे.
विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे आशा गुणीजनांना पुरस्कार वितरण व जेष्ठ नागरिक, माजी सैनिक यांचा भव्य नागरी सत्कार समारंभ आयोजित करण्यात येत आहे.
तरी सर्वानी या आनंद मोह उत्सवानिमित्त उपस्थित राहावे, आशे आव्हान तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदिप गवई यांनी केले आहे.