ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी..होळीनिमित्त मिळणार हे खास गिफ्ट

प्रतिनिधी अहिल्यानगर - संगीता खिलारी

राज्य सरकारकडून स्वस्त धान्य लाभार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. रेशनकार्ड धारकांना होळीच्या सणाच्या निमित्ताने एक खास गिफ्ट दिले जाणार आहे. यंदा होळीच्या सणाला रेशनसोबत एक साडीही दिली जाणार आहे.यामुळे महिलांना दिलासा मिळणार असून, राज्य सरकारचा या उपक्रमामुळे त्यांचे जीवन साकारत आहे.

अंत्योदय योजना यापूर्वी राज्य सरकारने अंत्योदय योजनेअंतर्गत कुटुंबातील महिलांना एक साडी वितरित करण्याचा निर्णय घेतला होता. त्याच धर्तीवर यंदाही होळीच्या सणावर रेशनकार्ड धारक महिलांना साडी देण्यात येणार आहे. जालना जिल्ह्यात 44,160 महिलांना, तसेच पुणे जिल्ह्यात 48,874 महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.

पुणे जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये साड्यांचे वितरण केले जाईल. बारामती तालुक्यात 7,975 महिलांना, दौंडमध्ये 7,222, जुन्नरमध्ये 6,838, पुरंदरमध्ये 5,285, तसेच इतर तालुक्यांमध्ये साड्यांचे वितरण होईल. यासोबतच, त्या महिलांना दिलेल्या साड्या गुणवत्ता तपासून दिल्या जाणार आहेत.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे