ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

जनसेवा फाउंडेशनच्या वतीने भव्य हळदीकुंकू समारंभ – लाडक्या बहिणींच्या सन्मानाचा सोहळा उत्साहात संपन्न..

शिर्डी.

मकरसंक्रांतीच्या पावन पर्वावर जनसेवा फाउंडेशनतर्फे महिलांसाठी भव्य हळदीकुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले. शिर्डीतील हा सोहळा केवळ एक कार्यक्रम नव्हता, तर लाडक्या बहिणींच्या सन्मानाचा, प्रेमाचा आणि एकतेचा उत्सव होता.

या सोहळ्याचे नेतृत्व नामदार राधाकृष्ण विखे पाटील, सौ शालिनी विखे पाटील, डॉ. सुजय दादा विखे पाटील आणि धनश्री विखे पाटील यांनी केले. या कार्यक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमस्थळी एक वेगळेच मांगल्य, उत्साह आणि आनंदाचे वातावरण होते.

सोन्याच्या नेकलेससह विविध बक्षिसांची मेजवानी..

या विशेष सोहळ्यात महिलांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये विजेत्यांना आकर्षक बक्षिसे देण्यात आली. विशेष म्हणजे, या स्पर्धेतील मुख्य आकर्षण सोन्याचा नेकलेस होता, जो जिंकण्याचा मान सौ. विजया सुरेश साळवे (प्रसाद नगर, शिर्डी) यांनी मिळवला. छत्रपती शासन यांच्या सौजन्याने हा नेकलेस प्रदान करण्यात आला.शिर्डी ग्रामस्थांनी संपूर्ण कार्यक्रमाची जबाबदारी घेत हा सोहळा दिमाखात पार पाडला.

कार्यक्रमाच्या शेवटी डॉ. सुजय विखे पाटील यांनी आपल्या भावनिक शब्दांत उपस्थित महिलांना उद्देशून मनोगत व्यक्त केले.“लाडक्या बहिणींनो, आज तुम्ही या कार्यक्रमाला दिलेल्या प्रतिसादाने आमची मने भरून आली आहेत. तुम्ही आमच्या कुटुंबाचा अविभाज्य भाग आहात. तुमच्या प्रेमावर आणि विश्वासावरच आम्ही उभे आहोत. आजच्या या मंगल सोहळ्याच्या निमित्ताने मी वचन देतो की, पुढील पाच वर्षे असाच भव्य हळदीकुंकू सोहळा आम्ही तुमच्यासाठी घेऊन येऊ!”“तसेच, नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांना तुम्ही मोठ्या मताधिक्याने निवडून दिलेत, त्याबद्दल मी माझ्या सर्व बहिणींचे आभार मानतो. हा स्नेह असाचअखंड राहू दे.. या भावनिक संवादानंतर उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात त्यांच्या या आश्वासनाचे स्वागत केले.

“संदीप पाटील यांच्या सूत्रसंचालनाने आनंदोत्सव अधिक रंगला!”

कार्यक्रमाची सूत्रसंचालन जबाबदारी संदीप पाटील यांनी सांभाळली. त्यांच्या मिश्किल आणि उत्साहवर्धक शैलीने महिलांना भरभरून हसवले आणि कार्यक्रमाचे रंगतदार रूपांतरण केले.

संक्रांतीच्या मंगल पर्वावर लाडक्या बहिणींसाठी अविस्मरणीय दिवस..

या सोहळ्याने शिर्डीतील महिलांच्या चेहऱ्यावर हसू फुलले, त्यांच्या आयुष्यात आनंदाचे क्षण भरले आणि प्रेमाचा गोडवा आणखी वृद्धिंगत केला.हा सोहळा केवळ हळदीकुंकू कार्यक्रम नव्हता, तर संक्रांतीच्या निमित्ताने एकत्र येऊन आपल्या बहिणींच्या सन्मानाचा उत्सव साजरा करण्याचा पवित्र सोहळा होता.“हा दिवस कायम आठवणीत राहील!” – अशा प्रतिक्रिया देत महिलांनी कार्यक्रम संपल्यावरही स्नेहभावाने आणि आनंदाने परस्परांना शुभेच्छा दिल्या.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे