ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

अहिल्यानगरमध्ये २६ ते ३० जानेवारी दरम्यान लोकशाही उत्सवाचे आयोजन

अहिल्यानगर

देश संविधानाचा अमृत महोत्सव साजरा करीत असताना भारताच्या लोकशाहीपुढे अनेक आव्हाने निर्माण झाली आहेत. राजकीय व व्यावहारिक पातळीवर अनेक अंगाने लोकशाहीला कमजोर करण्याचे काम सुरु आहे.

देशपातळीवर राजकीय अंगाने भांडवलदारी व्यवस्थेचे उदात्तीकरण सुरु आहे. अशावेळी हुकुमशाही, राजेशाही व्यवस्थेला नाकारणारी व सर्वहारा वर्गाला समता, बंधुता आणि सामाजिक न्याय देण्यास कटिबद्ध असलेली लोकशाही टिकली पाहिजे व ती तळागाळात झिरपली पाहिजे हा हेतू समोर ठेऊन नगरमध्ये सन २०२२ पासून लोकशाही उत्सवाला सुरुवात झाली. शहरातील वेगवेगळ्या पुरोगामी व समविचारी संघटनांनी एकत्रित येऊन हा उत्सव सुरू केला.

या वर्षी दि. २५ ते ३० जानेवारी २०२५ या दरम्यान लोकशाही उत्सवाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती लोकशाही उत्सव समितीचे अध्यक्ष डॉ. प्रशांत शिंदे यांनी दिली.

हा लोकशाही उत्सव दरवर्षी प्रजासत्ताक दिन ते महात्मा गांधी हौतात्म्य दिन या दरम्यान आयोजित करण्यात येतो. यावर्षी २५ जानेवारी रोजी दुपारी तीन वाजता विद्या कॉलनी, कल्याण रोड येथे श्री पारुनाथ ढोकळे, आनंद शितोळे यांच्या सहकार्याने रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

२६ जानेवारी रोजी प्रसिद्ध वास्तवपटकार वरुण सुखराज यांच्या ‘टू मच डेमॉक्रसी’ या शेतकरी आंदोलनाच्या वास्तवपटाचे प्रदर्शन व चर्चेचे आयोजन शांतिनिकेतन कॉलेज ऑफ फार्मसी, धोत्रे, ता. पारनेरला करण्यात आले आहे. तर २७ व २८ जानेवारीला डॉ. प्रशांत शिंदे, अशोक सब्बन व डॉ. बापू चंदनशिवे हे वेगवेगळ्या महाविद्यालयात जाऊन लोकशाहीवर व्याख्याने देणार आहेत.

२९ जानेवारीला नगरमध्ये शिवाजी नाईकवाडी यांच्या मार्गदर्शनाखाली संविधानाचा प्रचार प्रसार करणारे पथनाट्याचे सादरीकरण होणार आहे. तर ३० जानेवारी रोजी संध्याकाळी पाच वाजता रावसाहेब पटवर्धन स्मारक, सावेडी येथे प्रा. सुभाष वारे यांच्या हस्ते पारितोषिक वितरण कार्यक्रम व ख्यातनाम ऊर्दू कवयित्री कमर सुरूर यांच्या अध्यक्षतेखाली बहुभाषिक काव्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे.

या कविसंमेलनात प्रतिभा अहिरे (कन्नड), मुसेब आझमी (आझमगढ, उत्तर प्रदेश), नोमान सिद्दीकी (गोरखपूर, उत्तर प्रदेश), प्रकाश घोडके (पुणे) आणि बिलाल अहेमदनगरी सहभागी होणार असल्याची माहिती लोकशाही उत्सवाच्या निमंत्रक सोनाली देवढे-शिंदे, संध्या मेढे, ऍड. विद्या जाधव-शिंदे, प्रमिला कार्ले, सुरेखा आडम आणि समृद्धी वाकळे यांनी दिली. या सर्व उपक्रमात लोकांनी सहभागी व्हावे असे आवाहन खजिनदार अशोक सब्बन यांनी केले आहे

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे