ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

हॅलो मेडिकल फाऊंडेशनचे संस्थापक डॉ. शशिकांत अहंकारी यांचे पुण्यात निधन

पुणे

प्रसिद्ध समाजसेवक आणि हॅलो मेडिकल फाऊंडेशनचे संस्थापक डॉ. शशिकांत अहंकारी यांचे पुण्यात आज निधन झाले. त्यांना कर्करोग झाला होता. डॉ. शशिकांत अहंकारी हे उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील अणदूरचे रहिवासी. त्यांच्यावर उद्या अणदूरमध्ये अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

डॉ. शशिकांत अहंकारी यांनी अणदूरमध्येच आपल्या पत्नीसोबत मिळून हॅलो मेडिकल फाऊंडेशनची स्थापना केली होती. दोघे डॉक्टर पती-पत्नी येथे एका रुग्णालयात सेवा देत होते.

खेड्यापाड्यापर्यंत आरोग्य सेवा पोहोचवली

समाजातल्या तळागाळातील तसेच खेड्यापाड्यातील लोकांना तज्ज्ञ डॉक्टरांची सेवा मिळावी, या उद्देशाने डॉ. शशिकांत अहंकारी यांनी हॅलो फाऊंडेशनची स्थापना केली होती. डॉक्टरकीची पदवी मिळाल्यानंतर अहंकारी यांनी सुरूवातीला शहरात सेवा दिली. मात्र, आपल्या ज्ञानाचा समाजातील तळागाळातील लोकांना उपयोग व्हावा म्हणून शहरातील आपली फायदेशीर कारकीर्द सोडण्याचा निर्णय घेतला. खेड्यांना अधिक प्रभावी आणि परवडणारी आरोग्य सेवा मिळवण्यात मदत करण्यासाठी समर्पित टीमसह 1993 मध्ये हॅलो मेडिकल फाऊंडेशनची सुरुवात केली.

हॅलो मेडिकल फाऊंडेशनकडून या सेवा

हॅलो मेडिकल फाऊंडेशनचे काम पूर्व महाराष्ट्रातील दोन जिल्ह्यात प्रभावीपणे सुरु होते. डॉ. अहंकारी यांच्या हॅलो मेडिकल फाऊंडेशनकडून अनेक अतिरिक्त सेवा दिल्या जातात ज्यात दुय्यम-केअर हॉस्पिटल, आरोग्य विमा, स्वयं-सहायता गट, महिला सक्षमीकरण मंच, शाश्वत शेती आणि विज्ञान शिक्षण इत्यादीचा समावेश आहे.

चार राज्यस्तरीय समित्यांमध्ये समावेश

हॅलो मेडिकल फाउंडेशनमधील त्यांच्या कामामुळे डॉ. शशिकांत अहंकारी यांचा राज्य शासनाच्या चार समित्यांमध्ये सदस्य म्हणून समावेश करण्यात आला होता. त्यांनी आतापर्यंत पंधरा आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये हॅलो मेडिकल फाऊंडेशनचे कार्य सादर केले आहे. याशिवाय, डॉ. अहंकारी आणि हॅलो मेडिकल फाऊंडेशनने महिला सक्षमीकरणासाठी कार्यरत असलेल्या सर्वोत्कृष्ट एनजीओसाठी महाराष्ट्र फाऊंडेशन पुरस्कारासह अनेक पुरस्कार जिंकले आहेत.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे