ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

नगर तालुक्यातील हॉटेल व्यावसायिकाचे घर भरदिवसा फोडले..

अहमदनगर - लाखांचा ऐवज चोरट्यांनी केला लंपास.

नगर तालुक्यातील चास शिवारातील एका हॉटेल व्यावसायिकाचे बंद घर चोरट्यांनी दिवसा फोडून सुमारे 10 तोळ्याचे सोन्याचे दागिने, 20 हजारांची रक्कम असा चार लाख 10 हजारांचा ऐवज चोरून नेला. सदरची घटना बुधवारी (26 जून) सकाळी 10 ते दुपारी पावणे दोनच्या सुमारास घडली.

याप्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात रात्री पावणे बारा वाजता घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंबादास विश्वनाथ फलके (वय 57 रा. चास) यांनी फिर्याद दिली आहे. फलके यांनी त्यांचे राहते घर बुधवारी सकाळी 10 वाजता बंद केले होते. त्यानंतर चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला.

घरातील पाच तोळ्याचा सोन्याचा नॅकलेस, साडेतीन तोळ्याचा सोन्याचा राणीहार, पाऊण तोळ्याचे सोन्याचे कानातील टॉप्स, अर्धा तोळ्याची सोन्याची अंगठी व 20 हजारांची रोकड असा चार लाख 10 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. सदरचा प्रकार दुपारी पावणे दोनच्या सुमारास उघडकीस आला.

त्यानंतर फलके यांनी नगर तालुका पोलिसांना माहिती दिली. पोलीस उपअधीक्षक (नगर ग्रामीण) संपत भोसले, तालुका पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक प्रल्हाद गिते यांनी पथकासह घटनास्थळी भेट दिली.

फलके यांनी रात्री उशिरा दिलेल्या फिर्यादीवरून घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक रंजित मारग करत आहेत.

दरम्यान गेल्या काही दिवसांपासून नगर तालुक्यातील गावांत दिवसा घरफोडी होण्याचे प्रमाण वाढले असून गुन्ह्यांचा तपासही लागत नाही. घरफोड्या करणार्‍या टोळीला अटक करण्याची मागणी होत आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे