ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानीच्या भाविकांसाठी गाभाऱ्यातील प्राचीन शिळा..

महाराष्ट्रातील प्रसिद्ध देवस्थान कुलस्वामीनी तुळजाभवानीच्या भाविकांसाठी अत्यत महत्वाची अपडेट आहे. तुळजाभवानी देवस्थानाला महाराष्ट्रातील देवीच्या साडेतीन पीठांपैकी आदिशक्तीचे मूळ स्थान आहे, असे मानले जाते. महाराष्ट्रात या देवीस विशेष महत्त्व असून नवरात्रात येथे मोठा उत्सव असतो व भक्तांची गर्दी असते. दरम्यान या मंदिराच्या गाभाऱ्यासंदर्भात महत्वाची अपडेट समोर आली आहे.

तुळजाभवानीच्या मुख्य गाभा-यातील प्राचिन शिळांना तडे गेल्याची धक्कादायक बाब समोर आलीये..गाभा-याच्या संवर्धनाच्या वेळी गाभा-यातील चार शिळांना तडे गेल्याचं महंत तुकोजी बुवा यांनी निदर्शनास आणून दिली.. तडे गेलेल्या या शिळांचे स्ट्रक्चरल ऑडिट केलं जाणार असून रडारद्वारे त्यांची तपासणी केली जाणार आहे. या तपासणीनंतर प्रशासन शिळा बदलण्याचा निर्णय घेणार असल्याचं पुरातत्व विभागानं सांगीतलंय.

तुळजा हे त्वरजा या शब्दाचा अपभ्रंश आहे, असे सांगितले जाते. हे देवस्थान धाराशिव जिल्ह्यात वसलेले आहे. तुम्हाला येथे जायचे असल्यास चे सोलापूरपासून प्रवासाच्या दृष्टीने जवळ आहे. बालाघाटातील एका डोंगरमाथ्यावर देवीचे मंदिर आहे. महाराष्ट्राची कुलस्वामिनी म्हणून तुळजाभवानी देवीस अग्रमान आहे.

स्वराज्याची स्थापना करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांची ही कुलदेवता होय. तुळजा या देवीच्या आशीर्वादाने शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापनेची प्रेरणा मिळाली. देवीने महाराजांना दृष्टान्त देऊन महाराष्ट्रावरील दुष्टचक्राचे निवारण करण्यासाठी भवानी तलवार दिली होती, अशी आख्यायिका सांगितली जाते. भोसले घराण्याची ही कुलदेवता आहे. मंदिराच्या काही भागाची धाटणी हेमाडपंती असून मंदिराचे धार्मिक पूजेचे व्यवस्थापन आणि पुरोहिताचे अधिकार मराठा 153 पाळीकर भोपे कुळाकडे आहेत.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे