ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकिय

पंकजांना लाखो रुपये मदतीच्या घोषणा, प्रत्यक्षात रुपयाही खात्यात नाही

बीड

१९ कोटी रुपयांचा जीएसटी‎थकवल्याप्रकरणी भाजपच्या राष्ट्रीय‎सचिव पंकजा मुंडे यांच्या परळी‎तालुक्यातील पांगरी येथील वैद्यनाथ‎सहकारी साखर कारखान्यावर‎कारवाई केल्यानंतर पंकजा यांच्या‎मदतीला मुंडे समर्थक धावून आले‎आहेत. त्यांनी सोशल मिडिआवर‎लाखो रुपये मदतीच्या घोषणा‎केल्या असल्या तरी अद्याप‎पंकजांच्या खात्यात एक रुपयाही‎जमा झालेला नाही.

दरम्यान, पंकजा‎यांनी सोशल मीडिआतून‎समर्थकांशी संवाद साधला. त्यात‎त्यांनी म्हटले आहे की, मला‎कोणीही आर्थिक मदत करू नये.‎मात्र, सद्भावना आणि‎आशि‌र्वादाचे बळ कायम माझ्या‎पाठिशी उभे करा.‎

‎मुंडे‎‎ समर्थकांनी ‎‎सांगितले की, दोन‎‎दिवसांत बीड‎‎जिल्ह्यात सात‎‎कोटी रुपये‎गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या नावाने‎संकलित झाले आहेत. २८‎ऑक्टोबर राेजी सावरगाव येथे‎दसरा मेळावा होत असून या‎मेळाव्यात पंकजा यांच्याकडे १९‎कोटींपेक्षा जास्त रकमेचे धनादेश‎सुपूर्द करणार आहाेत.‎

१९ कोटींपेक्षा अधिक‎रक्कम जमा होईल‎

वैद्यनाथ सहकारी साखर‎कारखान्यास मदतीसाठी जिल्ह्यातुन‎उस्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. लोकनेते‎गोपीनाथ मुंडे यांनी उभा केलेल्या‎वैद्यनाथ कारखान्याला पूर्व वैभव‎मिळवुन देण्यासाठी मुंडे समर्थक‎सरावले आहेत. दसरा मेळाव्यात हे‎सर्व धनादेश एकत्रित करून पंकजा‎मुंडेंना दिले जाणार आहेत. १९‎कोटींपेक्षा जास्त रक्कम जमा होईल.‎आर्थिक परिस्थिती नसताना सामान्य‎शेतकऱ्यांसह अनेक लोक मदत करत‎आहेत. – राजेंद्र मस्के, जिल्हाध्यक्ष,‎भाजप‎

सोशल मीडियावर जाहीर रकमा

शालीनीताई कराड ५० लाख, भाजप जिल्हाध्यक्ष‎राजेंद्र मस्के- ११ लाख, विजय गोल्हार- ११ लाख,‎सलीम जहांगीर -(कोरा चेक), संतोष हांगे- (कोरा‎चेक), सर्जेराव तांदळे (वडिलोपार्जित जमीन),‎भाजप प्रवक्ते राम कुलकर्णी- १ लाख, संतोष राख -‎५ लाख, अमोल जायभाये- २ लाख, विवेक पाखरे -‎१ लाख, संग्राम बांगर- ५१ हजार, बाळासाहेब चोले-‎११ हजार, महारुद्र खेडकर – २१ हजार, सोमनाथ‎कऱ्हाडे – २१ हजार, भगवान गदळे – ५ लाख, अरुण‎मुंडे – ५ लाख, राम प्रभू मुंडे २५ हजार, अर्जुन तिडके‎५१ हजार, धनराज मुंडे – ५१ हजार, बालाजी फड-‎३१ हजार, गणेश बडे – २१ हजार, तेजस तिडके -२१‎हजार, ज्ञानेश्वर मुंडे – ५ हजार, दीपक मुंडे – १‎लाख, धनंजय घोळवे – ११ हजार, दादाहरी बटुळे-‎७,७७७, गणेश बहिरवाळ- १११११, हरीभाऊ तांदळे -‎५१ हजार, संदीपान ठोंबरे – ५ लाख.‎

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे