ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

भारत रत्न रतनजी टाटा यांना फटाका व्यापारी असो. च्या वतीने श्रद्धांजली अर्पण

अहमदनगर

रतनजी टाटा यांचे निधनाने भारताचा आश्रयदाता हरपला -श्रीनिवास बोज्जा 

दि अहमदनगर फटाका व्यापारी असोसिएशन च्या वतीने भारत रत्न रतनजी टाटा यांना नगर कल्याण रोड वरील होलसेल फटाका मार्केट मध्ये श्रद्धांजली अर्पण केली.

या वेळी असो. सचिव श्रीनिवास बोज्जा, उपाध्यक्ष सुरेशशेठ जाधव, सह सेक्रेटरी अरविंद साठे, संजय सुराणा, सुनील गांधी, देविदास ढवळे, अमोल तोडकर, विकास पटवेकर, उबेद खान, विजय मुनोत अथर्व बोज्जा आदी उपस्थित होते.

या वेळी बोलतांना श्री बोज्जा म्हणाले रतनजी टाटा यांच्या निधनाने भारताची सर्वच क्षेत्रात मोठी हानी झाली असून टाटा हे अष्टपैलू व्यक्तिमत्व होते. आपल्यातून एक महान व्यक्ती महान रत्न हरपला आहे. अतिशय दानशूर .प्रेमळ दीनदुबळ्याचा कैवारी .करोडो लोकांना रोजगार उपलब्ध करून देणारा उद्योग क्षेत्रात संपूर्ण जगा मध्ये भारताचे नाव उज्वल करणारा माणूस आज सर्वाना सोडून निघून गेला. रतनजी टाटा हे भारताचे आश्रयदाते म्हंटले तर वावगे ठरणार नाही असे बोज्जा म्हणाले.

या वेळी सुरेश जाधव यांनीही श्रद्धांजली वाहताना म्हणाले की, मरावे परी कीर्तिरूपे उरावे. अशी सर्वांना आठवणीत राहणारी व्यक्ती .ती म्हणजे माननीय रतनजी टाटा होते.

फटाका व्यापारी असोसिएशन च्या वतीने रतनजी टाटा यांना श्रद्धांजली अर्पण करतांना व्यापारी बंधू मोठया प्रमाणात उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे