ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

नसरापूर येथे साडेतीन वर्षाच्या मुलीवर अत्याचार करून आरोपी भीमराव कांबळे याला कोर्टाकडून फाशी ची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

पुणे

पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे साडेतीन वर्षाच्या मुलीवर अत्याचार करून तिचा निर्दयीपणे खून करण्यात आल्याच्या खटल्यात आरोपी भीमराव कांबळे (वय ६५) याला आज (सोमवारी, ता २९) कोर्टाकडून शिक्षा सुनावण्यात आली आहे.

विशेष न्यायाधीश एस. आर. साळुंखे यांच्या न्यायालयाने मागे गुरुवारी (दि. २५) झालेल्या सुनावणीत कांबळेला या प्रकरणात दोषी ठरविले होते. त्यामुळे कांबळेला फाशी होणार की जन्मठेप, याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. आज त्याला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे, गुन्हा घडल्यानंतर अवघ्या दोन महिन्यात निकाल लागला आहे.

अत्याचार महिन्यांत खटल्याची सुनावणी पूर्ण आणि खून खटल्यात सर्वात जलदगतीने निकाली लागलेला हा राज्यातील पहिलाच खटला ठरला आहे. आरोपीला आज पुणे जिल्हा सत्र न्यायालयात विशेष न्यायाधीश एस. आर. साळूंखे यांनी फाशीची शिक्षा सुनावली आहे.

विशेष सरकारी वकिल अजय मिसर यांनी भीमराव कांबळेला फाशीच्या शिक्षेची मागणी करताना त्यांच्या युक्तिवादाच्या समर्थनातील सर्वोच्च न्यायालयाचे १२ निकाल जोडले आहेत. हे सगळे निकाल नसरापूरच्या घटनेशी साधर्म्य असलेले आहेत आणि बऱ्याचश्या केसेसमध्ये दोषींना फाशीची शिक्षा झाली आहे. काही प्रकरणांमध्ये सत्र न्यायालयाने दिलेल्या फाशीची शिक्षा उच्च न्यायालयाने रद्द केलेली आहे आणि उच्च न्यायालयाचे निकाल पुन्हा सर्वोच्च न्यायालयाने फाशीच्या शिक्षेत रुपांतर केले आहे.

आधीच्या प्रकरणांमध्ये फाशीची शिक्षा कायम ठेवताना सर्वोच्च न्यायालयाने काही गोष्टी स्पष्ट केल्या आहेत. गुन्ह्यातील आरोपीने दाखवलेली क्रूरता आणि त्या घटनेचा समाजावर झालेले परिणाम याची सर्वोच्च न्यायालयाकडून फाशीची शिक्षा कायम ठेवताना दखल घेण्यात आलेली आहे.

पीडिता स्वतःच संरक्षण करू शकण्याच्या स्थितीत होती का नव्हती? तसेच हा रिअरेस्ट ऑफ रिअरेस्ट प्रमाणात मोडतो का? या सगळ्याची सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे