ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

नगर जिल्ह्यात ‘ईद ए मिलाद’ची सार्वजनिक सुट्टी सोमवारीच

अहमदनगर

राज्य शासनाने अधिसूचनेद्वारे ईद-ए-मिलादची सुट्टी जाहीर करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निर्णय घेण्याचे अधिकार अधिसूचित केले असल्याने जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी अहमदनगर जिल्ह्यात ईद-ए-मिलादची सार्वजनिक सुट्टी १६ सप्टेंबरला कायम ठेवली आहे.

शासनाच्या १३ सप्टेंबरच्या अधिसूचनेनुसार जिल्ह्यात मुस्लिम धर्मीयांकडून ईद-ए-मिलाद सणानिमित्त आयोजित मिरवणुकीचा दिनांक विचारात घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी १६ सप्टेंबरची सुट्टी कायम ठेवावी किंवा १८ सप्टेंबर रोजी द्यावी याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निर्णय घेण्याचे अधिकार देण्यात आले होते.

त्यानुसार अहमदनगर जिल्ह्यात अधिक मिरवणुका १६ सप्टेंबर रोजी निघणार असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे