ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

शिवसेना आमदार अनिल बाबर यांचं निधन

सांगली

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे समर्थक शिवसेना आमदार अनिल बाबर यांचं निधन झालं आहे. अनिल बाबर यांनी वयाच्या ७४ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

अनिल बाबर यांनी सांगलीतील खानापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व केलं. सरपंच ते आमदार असा त्यांचा राजकीय प्रवास राहिला. अनिल बाबर यांनी दु्ष्काळी भागातील पाणी प्रश्न सोडवण्यासाठी संघर्ष केला. शिवसेनेतील फुटीवेळी त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला होता.

अनिल बाबर यांना त्रास होत असल्यानं सांगलीतील एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. आज पहाटे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सांगलीच्या राजकारणात गेल्या जवळपास ५० वर्षांपासून कार्यरत असणाऱ्या त्यांच्या कुटुंबीयांसह समर्थकांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

अनिल बाबर यांनी जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून १९७२ मध्ये काम केलं. गार्डी गावचे संरपंच ते आमदार असा त्यांचा राजकीय प्रवास राहिला.

दरम्यानच्या काळात त्यांनी पंचायत समितीचे सभापती म्हणून काम केलं. १९९० मध्ये ते पहिल्यांदा आमदार बनले. यशवंत सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष म्हणून देखील त्यांनी काम केलं. अनिल बाबर यांनी १९९०, १९९९, २०१४, २०१९ मध्ये विधानसभा निवडणुकीत विजय मिळवला होता.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे