ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

निवृत्तिनाथ महाराजांचा पालखी सोहळ्यानिमित्त या ठिकाणच्या वाहतुकीत बदल पोलीस अधीक्षकांचे आदेश

अहमदनगर

आषाढीनिमित्त श्री निवृत्तिनाथ महाराजांचा पालखी सोहळा दरवर्षी पायी दिंडीद्वारे त्र्यंबकेश्वर ते पंढरपूर आणि परत पंढरपूर ते त्र्यंबकेश्वर असा होत असतो. या सोहळ्यामध्ये सुमारे ५० ते ६० हजारांच्या संख्येने वारकरी महाराजांच्या पालखी बरोबर प्रवास करीत असतात.

संत निवृत्ती महाराज पालखी सोहळ्यासाठी (दि.२६) ते (दि. २८) जून दरम्यान वाहतूक मार्गात बदल करण्यात आला आहे. याबाबतचे आदेश गुरूवारी (दि.२०) जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी काढले आहेत.

संगमनेर तालुका हद्दीतील गावांमधून संत निवृत्ती महाराज पालखी जात असते. (दि.२६) जून रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास संगमनेर तालुक्यातील पारेगाव बुद्रुक येथे श्री संत निवृत्ती महाराज पालखीचे आगमन व मुक्काम होणार आहे.

पालखी (दि.२७) जून रोजी सकाळी सहा वाजेच्या सुमारास नांदूर शिंगाटे ते लोणी जाणारे महामार्गावरुन तळेगाव दिघे मार्गे वडझरी बुद्रुक, वडझरी खुर्द, कासारे, लोहारे पुढे लोणी, गोगलगाव येथे मुक्काम (दि.२८) जून रोजी सकाळी सहा वाजता पुन्हा नांदूर शिंगोटे लोणीच्या दिशेने जाणार आहे. तर नांदूर शिंगोटे ते लोणी हा रस्ता खुपच अरुंद आहे. या रस्त्यावरून सर्व जड वाहतूक चालु असते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे