ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

तुम्ही कधी कर्ज घेतले नाही तरी मोठ्या आर्थिक संकटात सापडाल, फेडावे लागेल दुसऱ्याचे कर्ज..

मुंबई

कर्ज घेणं आणि वेळेत त्याची परतफेड करणं या दोघांमध्ये खूप फरक असतो. कर्ज घेणाऱ्या कदाचित प्रत्येक व्यक्तीला प्रश्न पडत असेल की कर्जाची परतफेड करण्यापूर्वीच मृत्यू झाला तर त्याचे कर्ज माफ होईल का? कर्जमाफी झाली नाही तर उर्वरित कर्जाचा हप्ता कोण भरणार?

कर्ज घेतं दुसरीच व्यक्ती आणि परतफेड मात्र इतर कोणालातरी करावी लागेल. अशी प्रकाराने आपण अनेकदा ऐकली किंवा पहिली असतील, पण असे का होते? कर्ज घेऊन त्याची वेळेवर परतफेड करणे आवश्यक असते, पण काही कारणामुळे अनेक जणांना अडचणींना सामोरे जावे लागते. तुम्ही घेतलेल्या कर्जाची वेळेवर परतफेड केली नाही तर बँक तुमच्या विरोधात कडक कारवाई करू शकते. पण आता प्रश्न आता आहे की कर्जदाराच्या मृत्यू झाला तर त्याचे कर्ज माफ होते का? आणि कर्जमाफी झाली नाही तर कर्जाची परतफेड कोणी करायची?

कर्जदाराच्या मृत्यू झाल्यास परतफेड कोण करणार?

कर्ज घेताना एखाद्या व्यक्तीला कर्जाचा हमीदर व्हावा लागतो म्हणजे, ती व्यक्ती कर्ज फेडण्याची हमी देते. अशा परिस्थितीत कर्जाची परतफेड न केल्यास कर्जाची उर्वरित रक्कम हमीदाराच्या अंगलट येते. म्हणूनच कोणत्याही कर्जाचे जामीनदार होण्यापूर्वी नेहमी विचार करण्याचा आर्थिक तज्ञ देखील सल्ला देतात.

सोप्या शब्दात बोलायचे तर तुम्ही कोणतेही कर्ज घेतले नसेल आणि तुमच्या शेजाऱ्याच्या दहा लाख रुपयांच्या कर्जाचे हमीदार बनतात. तर अशा स्थितीत, तुमच्या शेजाऱ्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या कर्जाची रक्कम भरण्याची जबाबदारी आता तुमची असेल. तसेच तुम्ही कर्जाची परतफेड केली नाही तर बँक तुमच्यावर कठोर कारवाई करेल.

कर्जाच्या हमीदाराचे नाव बदलता येते का?

एखाद्या व्यक्तीने वैयक्तिक कर्ज घेतले तर कर्जाचा हमीदार, कायदेशीर वारस किंवा सहकर्जदाराचे नाव देखील बदलू शकते. हमीदार देखील वैयक्तिकरित्या बँकेत जाऊन नाव बदलण्याची विनंती करू शकतो. वैयक्तिक कर्ज इतर कर्जाच्या तुलनेत खूपच महाग असले तरी ते असुरक्षित कर्ज मानले जाते, म्हणजे या या कर्जामध्ये कोणतीही हमी द्यावी लागणार नाही.

एकूणच कर्जाची परतफेड करण्यापूर्वी कर्जदाराचा मृत्यू झाल्यास कर्जाची रक्कम हमीदार किंवा कायदेशीर वारसांकडून वसूल केली जाऊ शकत नाही. त्यामुळे तुम्हीपण एखाद्या व्यक्तीच्या कर्जाचा हमी बनणार असाल तर आधी काळजीपूर्वक विचार करा जेणेकरून तुमचा निर्णय भविष्यात अंगलट येणार नाही.

 

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे