ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

नगर शहरातील सारसनगर येथे दोन एकर जागेत साकारतेय महानगरपालिकेचे भव्य क्रीडा संकुल

अहिल्यानगर - सारसनगर येथे दोन एकर जागेत साकारतेय महानगरपालिकेचे भव्य क्रीडा संकुल

इनडोअर व आऊटडोअर खेळांसाठी मैदाने, हॉलचा समावेश..काम अंतिम टप्प्यात, मार्च महिन्यात खुले होणार – आयुक्त यशवंत डांगे

शहरातील रस्ते, पाणी व वीज या पायाभूत सुविधांचा प्रश्न टप्प्याटप्प्याने मार्गी लावण्याचे नियोजन महानगरपालिका करत आहे. त्यासह नागरिकांना मनोरंजन, विरंगुळा, आरोग्य सेवांसह खेळाडूंना चांगल्या क्रीडा सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी क्रीडा संकुलाचा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. सारसनगर परिसरात सुमारे दोन एकर जागेत सर्व अत्याधुनिक सुविधांचा समावेश असलेल्या या क्रीडा संकुलाच्या उभारणीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. येत्या सहा महिन्यांत हे क्रीडा संकुल नागरिकांसाठी खुले होईल, अशी माहिती आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी दिली.

आयुक्त यशवंत डांगे यांनी कामाची पाहणी करून आढावा घेतला. महानगरपालिकेच्या माध्यमातून साकारल्या जात असलेल्या या प्रकल्पासाठी आमदार संग्राम जगताप यांनी ३ कोटी ४३ लाख रुपयांचा निधी जिल्हास्तर सुवर्णजयंती नगरोत्थान अभियानातून उपलब्ध करून दिला आहे. या क्रीडा संकुलात विविध प्रकारच्या इनडोअर व आऊटडोअर क्रीडा प्रकारांसाठी मैदाने व सुविधा देण्यात येणार आहेत. लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्व वयोगटातील व्यक्तींना या सुविधांचा लाभ घेता येणार आहे.

क्रीडा संकुलात टेनिस कोर्ट, व्हॉलीबॉल, बास्केट बॉल, बॉक्स क्रिकेट, कबड्डी आदी विविध खेळांसाठी मैदाने असणार आहेत. तसेच बॅडमिंटन हॉल, टेबल टेनिस, रायफल शूटिंग, बॉक्सिंग रिंग, मल्टिपर्पज हॉलमध्ये कॅरम, बुद्धीबळ अशा व इतर इनडोअर खेळांसाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या खेळांच्या स्पर्धा भरविता येतील, अशा पद्धतीने सर्व प्रकारच्या सुविधा खेळाडूंना उपलब्ध होणार आहेत.

तसेच, या भव्य क्रीडा संकुला भोवती मोठी संरक्षक भिंत व नागरिकांसाठी जॉगिंग ट्रॅक उभारण्यात येणार आहे. सर्व वयोगटातील व्यक्तींसाठी अत्याधुनिक यंत्र व साधने असणारी जिम, योगासाठी हॉल व झुंबासाठीही स्वतंत्र हॉल उभारण्यात येणार असल्याचे आयुक्त यशवंत डांगे यांनी सांगितले.

 

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे