ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

बस बंद केल्याने प्रवाशांची गैरसोय

अकोले या आदिवासी तालुक्यातील सर्वाधिक दुर्गम भागातील, रतनवाडी, शेणीत मुक्कामी एसटी बस बंद केली. वाघापूर, देवगाव- राजूर, बलठन मुक्कामी देवगाव मार्गे जात नाही.

अनेक गावच्या बसच्या फेऱ्या बंद केल्या आहेत, त्या चालू करा, असे निवेदन ग्राहक पंचायतीच्या वतीने एस.टी. महामंडळाला देण्यात आले आहे.

ग्राहक पंचायतीचे तालुकाध्यक्ष दत्ता शेनकर, मच्छिद्र मंडलिक, रमेश राक्षे यांनी निवेदनात म्हटले की, एस. टी. बस सेवा अचानक बंद करण्यात आली. यामुळे आदिवासी अतिदुर्गम भागातील एस टी बस वर अवलंबून असणाऱ्या विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, अपंग इत्यादी प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहे.

महाराष्ट्र शासनाने ज्येष्ठ नागरिक व महिलांना प्रवासात पन्नास टक्के सवलत व ७५ वर्षा पुढील नागरिकांना मोफत प्रवास योजना सुरु केली. या योजनेच्या माध्यमातून ग्रामीण, शहरी भागातील ज्येष्ठ नागरिकांना व महिलांना, विद्यार्थ्यांना, अपंग व्यक्तीला याचा मोठा फायदा होत आहे.

वरील गावातील येणाऱ्या जाणाऱ्या बसेस बंद असल्याने खाजगी वाहनांमध्ये प्रवास करणे हे ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, अपंग व्यक्ती नागरिकांना अत्यंत धोकादायक ठरत आहे. आदिवासी दुर्गम भागातील एस टी बसेस मुक्कामी बंद झाल्यामुळे व काही गावातील एस टी बसेस च्या फेऱ्या बंद झाल्या मुळे ज्येष्ठ नागरिकांना, विद्यार्थ्यांना आर्थिक मनस्ताप होत आहे. वरील गावातील एस टी बसेस तत्काळ चालू करण्यात याव्यात असे निवेदनात म्हटले आहे.

निवेदनावर ग्राहक पंचायत महाराष्ट्र शाखा अकोले तालुक्यातील मच्छिद्र मंडलिक, रमेश राक्षे, दत्ता शेनकर, गंगाराम धिंदळे, मोहन मुंढे, भाऊसाहेब वाकचौरे, राम रद्रे, दत्ता ताजणे, नरेंद्र देशमुख, रामदास पांडे,

प्रकाश कोरडे, ज्ञानेश पुंडे, गणपत शेळके, गणपत थिगळे, जालिंदर बोडके, अॅड. दिपक शेटे, अॅड. राम भांगरे, माधव टिटमे, सुदाम मंडलिक, मच्छिद्र चौधरी, भाऊसाहेब गोर्डे, लक्ष्मण गोडसे आदींची नावे आहेत.

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे