ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

अहमदनगर शहरात शनिवारी जनावरांची मोफत तपासणी उपचार शिबिराचे आयोजन

अहमदनगर

जागतिक पशुचिकित्सा दिवसाचा उपक्रम . पशुपालकांना लाभ घेण्याचे आवाहन.

जागतिक पशुचिकित्सा दिवसानिमित्त जिल्हा पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय व जायंट्स ग्रुप ऑफ अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी (दि.27 एप्रिल) जनावरांची मोफत तपासणी उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. जुने बस स्थानक जवळील जिल्हा पशु सर्व चिकित्सालय हॉस्पिटलमध्ये होणार्‍या या शिबिराचा पशु पालकांना लाभ घेण्याचे आवाहन पशुसंवर्धन विभागाचे सहाय्यक आयुक्त डॉ. मुकुंद राजळे यांनी केले आहे.

शनिवारी सकाळी 10 वाजता शिबिराचे उद्घाटन होणार आहे. या शिबिरामध्ये मोफत श्‍वानदंश रोग प्रतिबंधक (रेबीज) लसीकरण, धनुर्वात प्रतिबंधक लसीकरण तसेच जंत प्रतिबंधक औषधे देण्यात येणार असल्याची माहिती जायंटस् वेल्फेअर फाउंडेशनचे स्पेशल कमिटी सदस्य संजय गुगळे यांनी दिली.

हे शिबिर यशस्वी करण्यासाठी डॉ. शशिकांत कारखेले, डॉ. वर्षा साबळे, डॉ. ज्ञानेश्‍वर काळे, जायंटस् ग्रुप ऑफ अहमदनगरच्या अध्यक्षा पूजा पातुरकर, विद्या तन्वर नूतन गुगळे आदी प्रयत्नशील आहेत. शिबिरासाठी अजय मेडिकल शारदा एजन्सी व कडूस डिस्ट्रीब्यूटर्सने सहकार्य केले आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे