ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

निलेश लंकेंच्या प्रचारात आम आदमी पार्टीची आघाडी

अहमदनगर - (शहर प्रतिनिधी) संगीता खिलारी

लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी चालू झाल्यापासून अहमदनगर दक्षिण मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांनी प्रचारात चांगलीच आघाडी घेतली असून संपूर्ण मतदार संघातून त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

निलेश लंकेंच यांनाच अहमदनगर दक्षिण मतदारसंघातून खासदार करणार असल्याची सर्वसामान्य मतदारांमध्ये जोरदार चर्चा सुरू आहे.  प्रचारामध्ये सर्वच घटक पक्ष आत्मियतेने सहभागी झाले असून आम आदमी पार्टीचे सुद्धा प्रचारात आघाडीवर असल्याचे दिसून येते.

आज दिल्लीगेट पासून सुरू झालेली मोटारसायकल रॅली स्वतः उमेदवार निलेश लंकेच्या उपस्थितीमुळे चांगलीच गाजली.यामध्ये आम आदमी पार्टीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते विशेषतः भरत खाकाळ, प्रा.अशोक डोंगरे,नामदेव ढाकणे,इंजि.प्रकाश फराटे, राजेंद्र कर्डिले, सामल, भिंगारदिवे,गणेश मारवाडे,देवदत्त साळवे,ॲड. विद्या शिंदे, सौ संगीता खिलारी हे सहभागी झाले होते,

त्याचबरोबर नलिनी गायकवाड,निता बर्वे,स्वाती साळवे,रजनी ताठे,फरीन शेख,रजनी भोसले,शारदा उल्हारे,खुशी जाधव व रूकया शेख हे सुद्धा सहभागी झाले होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे