ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

अहमदनगर अर्बन बॅंक गैरव्यवहार प्रकरण, दहा आरोपींविरुद्ध दोषारोपपत्र दाखल

अहमदनगर

नगर अर्बन बॅंकेतील गैरव्यवहार प्रकरणी अटकेत असलेल्या १० आरोपींविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. तब्बल ८ हजार पानांचे दोषारोपपत्र ९० दिवसांच्या मुदतीच्या आत दाखल करण्यात आले.प्रदीप जगन्नाथ पाटील, राजेंद्र शांतीलाल लुणिया, मनीष दशरथ साठे, अनिल चंदुलाल कोठारी, अशोक माधवलाल कटारिया, शंकर घनश्यामदास अंदानी, मनोज वसंतलाल फिरोदिया, प्रवीण सुरेश लहारे, अविनाश प्रभाकर वैंकर, अमित वल्लभभाई पंडित या दहा आरोपींविरुद्ध दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. नगर अर्बन बँकेतील २९१ कोटींच्या अफरातफरीबाबत कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये तत्कालीन संचालक, अधिकाऱ्यांसह कर्जदारांचा समावेश आहे. अर्बन बॅंकेच्या कर्ज घोटाळ्यात दिवसेंदिवस नवीन माहिती समोर येत आहे. शेकडो आरोपी असलेल्या या घोटाळ्यामुळे १०९ वर्षे जुनी बॅंक बंद पडली. त्यामुळे बॅंकेत ठेवलेल्या ठेवीदारांच्या ठेवी अडकून पडल्या आहेत. आर्थिक गुन्हे शाखेने दहा आरोपींना अटक केल्यानंतर आता त्यांच्या विरोधात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. पोलिस उपअधीक्षक अमोल भारती गुन्ह्याचा तपास करीत आहेत.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे