ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्रसंपादकीय

स्व. सुरेश बोज्जा (कारभारी ) यांचे प्रथम पुण्यस्मरण निमित्त कवी संमेलन

अहमदनगर

स्व. सुरेश रामय्या बोज्जा (कारभारी) यांचे प्रथम पुण्यस्मरण निमित्त दिनांक 29 मार्च 2024 रोजी कोहिनुर मंगल कार्यालय, सावेडी, अहमदनगर येथे जेष्ठ कवी प्रकाश घोडके पुणे, वसंत डंबाळे औरंगाबाद, अनंत कराड बीड, सूर्यकांत वरकड, नगर, युवराज वायभासे, आष्टी व शर्मिला गोसावी, नगर या जेष्ठ कविचे कवी संमेलन आयोजित करण्यात आले.

असून या कर्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून खा. सुजय विखे पा. व आ. संग्राम भैय्या जगताप राहणार आहेत. या वेळी समाजात आपआपल्या परीने ज्यांनी कौतुकास्पद कार्य केले असे जेष्ठ नागरिक विठ्ठल बाबुराव गोरे, सेवानिवृत्त असी. माध्य. शिक्षक, डॉ. प्रा. अशोक दत्तात्रय काळे, सेवानिवृत्त डेप्युटी डायरेक्टर म. फुले कृषी विदयापीठ, श्रीमती सविता भास्कर जोशी, सेवानिवृत्त डेप्युटी अकौंटट ट्रेझरी ऑफिस, श्याम दत्तात्रय सदावर्ते, सेवानिवृत्त शुगर फॅक्टरी, किसन व्यँकटी बोमादंडी, सामाजिक कार्य, भूमय्या लक्ष्मन बोगा, सामाजिक कार्य, श्रीमती लक्ष्मीबाई किष्टय्या बिटला, जेष्ठ नागरिक, नरसय्या चंद्रय्या नल्ला, प्रवचनकार व पुरोहित, शंकर राजन्ना द्यावनपेल्ली, सुरेश अच्युतराव क्षीरसागर, सेवानिवृत्त एस टी डेपो,व सामाजिक कार्य,गोरक्षनाथ विठ्ठलराव विघ्ने, जेष्ठ उद्योजक, रमेश गोटू कांडीवकर सेवानिवृत्त एस टी व सामाजिक कार्य, सतीश प्रभाकर डेरेकर, जेष्ठ पत्रकार व प्रमोद दत्तात्रय कांड, सहकार खात्यात उत्तम कार्य अश्या जेष्ठ नागरिकांचा सन्मान ठेवला असून या स्व. सुरेश बोज्जा यांच्या कार्या बाबत चित्रफीत दाखविण्यात येणार असून या कर्यक्रमास मोठया संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास बोज्जा, मा. नगरसेविका सौ. वीणा बोज्जा, विजय बोज्जा, संतोष बोज्जा, मनोज बोज्जा,अनिता मुत्याल व संदीप मुत्याल यांनी केले आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे