ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

नगर अर्बन बँक घोटाळा आरोपींची मालमत्ता जप्त करून लिलाव प्रक्रिया

अहमदनगर

नगर अर्बन बँक कर्ज गैरव्यवहार व घोटाळा प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर प्रथमच बँक बचाव समिती, ठेवीदार, अवसायक यांची एकत्रित बैठक काल, शनिवारी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात झाली.

अवसायक गायकवाड, तपासी अधिकारी तथा आर्थिक गुन्हे शाखेचे उपअधीक्षक संदीप मिटके, समितीचे राजेंद्र गांधी. कुलकर्णी, अॅड. अच्युत पिंगळे, बहिरनाथ वाकळे, संध्या मेढे तसेच ठेवीदार उपस्थित होते. या बैठकीत अवसायक गायकवाड यांनी वरील माहिती दिली.

बैठकीत अवसायक गायकवाड यांनी सांगितले की, बँकेचे २ लाख ७८२ खातेदार आहेत. परंतु kyc पूर्तता होईपर्यंत पैसे देऊ शकत नाही. आत्तापर्यंत १७२६९ खातेदारांना २९३ कोटी ५७ लाख रुपये परत दिले गेले आहेत. आता डीआयसीजीसीकडे ११३५ ठेवीदारांचा ५५ कोटींचा प्रस्ताव सादर केला जाणार आहे.

अवसायकाची नियुक्ती झाल्यापासून, ४ ऑक्टोबर २०२३ पासून ४ कोटी ३५ लाखांची वसुली झाली आहे. ५ लाखांपेक्षा अधिक रकमेच्या ११९८ ठेवीदारांचे ३१३ कोटी रुपये द्यायचे आहेत, त्यातील १२२ कोटी बाकी आहेत. बँक सध्या ४० ते ४५ कोटी रुपये देऊ शकते. एकूण देणी १७५ कोटी रुपयांची आवश्यकता आहे. कर्ज वसुलीतून ४०० कोटी मिळू शकतात. मात्र डीआयसीजीसीचे ३४३ कोटी रुपये देणे बाकी आहे.

अनावश्यक खर्च बंद करण्यासाठी भाड्याच्या कार्यालयात असलेल्या १७ शाखा बंद केल्या जाणार आहेत. एकरकमी कर्ज व्याज सवलत योजना (ओटीएस) राबवण्यासाठी रिझर्व बँकेची परवानगी मागितली जाईल.

त्यातून ४० ते ४५ कोटी रुपये वसूल होतील. मालमत्ता जप्ती करणे व लिलाव करणे या प्रक्रियेची पूर्वतयारी सुरू असून त्याचे प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे दाखल केले जातील, असे गायकवाड यांनी सांगितले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे