ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

कल्याण रोड परिसरात चोरट्यांचा हैदोस…

अहिल्यानगर

शहरातील कल्याण रोड परिसरातील रायगड हाईट्स या सोसायटीमध्ये अज्ञात चोरट्यांनी पुन्हा एकदा धाडसी चोरी करून पोलिसांना आव्हान दिले आहे.

गुरुवारी (दि. 09) सकाळी हा प्रकार उघडकीस आला. चोरट्यांनी सोसायटीच्या पार्किंंगमध्ये लावलेली एक संपूर्ण मोटारसायकल चोरली, तर इतर तीन मोटारसायकलींची चाके काढून नेली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

याप्रकरणी शिक्षक असलेले संजय विठ्ठल शिंदे (वय 39, रा. रायगड हाईट्स, गणेशनगर) यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

संजय शिंदे यांनी बुधवारी सायंकाळी त्यांची दुचाकी क्रमांक (एमएच 16 सीपी 1088 ) सोसायटीच्या पार्किंगमध्ये लावली होती. गुरुवारी सकाळी ते कामावर जाण्यासाठी घराबाहेर आले असता त्यांची दुचाकी जागेवर दिसली नाही. त्यांनी आजूबाजूला चौकशी केली असता, त्याच सोसायटीमधील किरण अशोक माने, हर्षल देवराम गोडे आणि मोतीराम उत्तम शिंदे यांच्याही मोटारसायकलींना चोरट्यांनी लक्ष्य केल्याचे दिसून आले.

चोरट्यांनी किरण माने आणि हर्षल गोडे यांच्या दुचाकींची समोरील चाके, तर मोतीराम शिंदे यांच्या दुचाकीची दोन्ही चाके चोरून नेली असल्याचे निदर्शनात आले.

घटनेची माहिती मिळताच तोफखाना पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू आहे. या प्रकारामुळे सोसायटीतील रहिवाशांमध्ये सुरक्षेच्या दृष्टीने चिंता वाढली असून, आरोपीना जेरबंद करण्याची मागणी नागरिकांनी केली आहेत.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे