ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

मनपा अकॅशन मोडवर… एचएमपीव्ही विषाणू चिंतेचे कारण नाही, नागरिकांनी आवश्यक दक्षता घ्यावी

अहिल्यानगर - श्वसनाच्या संसर्गापासून बचाव करण्यासाठी महानगरपालिकेच्या सूचनांची अंमलबजावणी करावी..

चीनमध्ये मानवी मेटान्यूमो व्हायरसचा (एचएमपीव्ही) उद्रेक झाल्याच्या वृत्ताच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या आरोग्य विभागाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. महाराष्ट्रात आतापर्यंत एचएमपीव्हीचा एकही रुग्ण आढळलेला नाही.

चीनमधून आलेल्या या नवीन विषाणुमुळे चिंतेचे कारण नसले तरी, नागरिकांनी आवश्यक दक्षता घ्यावी. या प्रकरणी भितीचे वातावरण निर्माण करू नये, महानगरपालिकेने दिलेल्या सूचनांची अंमलबजावणी करावी, असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी केले आहे.

एचएमपीव्ही हा एक हंगामी रोग आहे. जो सामान्यतः आरएसव्ही आणि फ्लूप्रमाणेच हिवाळा आणि उन्हाळयाच्या सुरुवातीला उद्भवतो. या अनुषंगाने केंद्राच्या आरोग्य विभागाने ३ जानेवारी रोजी निवेदन प्रसिध्द केले आहे.

त्यानुसार सार्वजनिक आरोग्य विभागाने राज्यातील श्वसनाच्या संसर्गाच्या आकडेवारीचे विश्लेषण केले आहे. वर्ष २०२३ च्या तुलनेत डिसेंबर २०२४ मध्ये कोणतीही वाढ झालेली नाही. मात्र, खबरदारीचा भाग म्हणून नागरिकांनी श्वसनाच्या संसर्गापासून बचाव करण्यासाठी काय करावे आणि काय करू नये या संदर्भातील सूचनांचे पालन करावे, असे आवाहन आयुक्त यशवंत डांगे यांनी केले आहे.

नागरिकांनी हे करावे 

१) जेव्हा आपल्याला खोकला किंवा शिंका येत असेल तेव्हा आपले तोंड आणि नाक रुमाल किंवा टिश्यू पेपरने झाका.

२) साबण आणि पाणी किंवा अल्कोहोल आधारित सॅनिटायझरने आपले हात वारंवार धुवावेत.

३) ताप, खोकला आणि शिंका येत असल्यास सार्वजनिक ठिकाणांपासून दूर रहावे.

४) भरपूर पाणी प्यावे आणि पौष्टिक अन्न खावे.

५) संक्रमण कमी करण्यासाठी सर्व ठिकाणी पुरेसे वायुविजन (व्हेंटीलेशन) होईल, याची दक्षता घ्यावी.

नागरिकांनी हे करू नये 

१) हस्तांदोलन करू नये.

२) टिश्यू पेपर आणि रुमालाचा पुनर्वापर करू नये.

३) आजारी लोकांशी जवळचा संपर्क टाळावा.

४) डोळे, नाक आणि तोंडाला वारंवार स्पर्श करणे टाळावे.

५) सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये.

६) डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषध (सेल्फ मेडिकेशन) घेऊ नये.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे