ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

नगर अर्बन बँक घोटाळ्या प्रकरणी दोन अधिकाऱ्यांना अटक

अहमदनगर

अहमदनगर जिल्ह्यातील नगर अर्बन बँक घोटाळा प्रकरण राज्यभर गाजले. आंदोलकांनी देखील विविध आंदोलने करत प्रशासनास धारेवर धरले.

आता नगर अर्बन बँकेच्या कर्ज फसवणूक व दीडशे कोटींच्या घोटाळ्यात बँकेच्या दोन अधिकाऱ्यांना आर्थिक गुन्हे शाखेने बुधवारी अटक केली आहे.

शाखाधिकारी राजेंद्र शांतीलाल लुनिया (रा. नगर) व शाखाधिकारी प्रदीप जगन्नाथ पाटील (रा.नगर) अशी अटक केलेल्या अधिकाऱ्यांची नावे आहेत. त्यांना आर्थिक गुन्हे शाखेने चौकशीसाठी बोलावले होते. चौकशीनंतर रात्री उशिरा त्यांना अटक करण्यात आली आहे.

बँकेचे माजी संचालक राजेंद्र गांधी यांच्या फिर्यादीवरून नगर अर्बन बँकेतील २८ संशयित कर्ज प्रकरणात फसवणूक व १५० कोटींचा घोटाळा केल्याप्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. आर्थिक गुन्हे शाखेमार्फत याचा तपास सुरू आहे.

तत्कालीन पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांच्या आदेशानुसार नगर अर्बन बँकेच्या कर्ज प्रकरणांचे फॉरेन्सिक ऑडिट करण्यात आलेले आहे. त्याचा अहवालही आर्थिक गुन्हे शाखेकडे सादर झालेला आहे. यात दोषी संचालक, कर्जदार व अधिकाऱ्यांची यादी तयार करण्यात आली आहे.

तपासी अधिकारी तथा उपअधीक्षक हरिष खेडकर यांनी गुन्ह्याच्या तपासासाठी काही अधिकारी व कर्मचाऱ्यांना बुधवारी चौकशीसाठी बोलवण्यात आले होते. चौकशीनंतर लुनिया व पाटील यांना अटक करण्यात आली.

कर्जमंजुरी प्रकरणात त्यांच्यावर ठपका असल्याचे उपअधीक्षक खेडकर यांनी सांगितले. या दोघांच्या अटकेनंतर आता इतरांचेही धाबे दणाणले आहेत.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे