ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्रसामाजिक

भारतीय सिंधू सभा आयोजित सिंधी नाटक ‘वापारीअ जी रिटायरमेंट’ला प्रतिसाद

अहमदनगर

महाराष्ट्र राज्य सिंधी साहित्य अकादमी, मुंबई व भारतीय सिंधू सभा, अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमाने सावेडी रोडवरील माऊली सभागृह,नगर येथे नुकताच उल्हासनगर येथील सिंधी कलाकार संगमच्या कलाकारांना ‘वापारीअजी रिटायरमेंट’ हे मनोरंजक व संदेशप्रधान असे सिंधी नाटक सादर केले. त्याला नगरमधील सिंधी समाज बांधवांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला.

याप्रसंगी मा.महेश सुखरामानी (कार्याध्यक्ष, महाराष्ट्र राज्य सिंधी साहित्य अकादमी, मुंबई), सदस्य डॉ.मदन जेसवानी, सामाजिक कार्यकर्ते इंदर आहुजा (उल्हासनगर), सदस्य व भारतीय सिंधू सभेचे जिल्हाध्यक्ष दामोदर बठेजा आदिं मान्यवर उपस्थित होते. त्यांचा व कलाकारांचा यथोचित सत्कार करण्यात आला.

यावेळी महेश सुखरामाणी म्हणाले, महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या सिंधी साहित्य अकादमी द्वारा स्थानिक कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी व मातृभाषा सिंधी भाषेची बाल व युवा वर्गाला गोडी लागावी, सिंधी समाजाचा इतिहास, सभ्यता, संस्कृती, परंपरा, सणवार आदि विषयांवर नाटिका, सांस्कृतिक कार्यक्रम ठिकठिकाणी आयोजित केले जात असून, त्यास उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचे सांगून शेवटी युवांनी, पालकांनी मातृभाषेचा दैनंदिन व्यवहारात वापर करावा, असे आवाहन केले.

या दोन अंकी नाटकात नोकरी करणार्याला विशिष्ट वयोमानानंतर रिटायरमेंट अर्थात निवृत्ती मिळते, त्याला निवृतीवेतन मिळते व निवृत्तीनंतरचे आयुष्य तो आरामात जगू शकतो, पण व्यापारी हा अहोरात्र कष्ट करतो, खरेदी-विक्री, उधारी-वसुली, स्पर्धा अशा अनेक अडचणींना तोंड देतो, व्यवसायाबरोबर कौटूंबिक, सामाजिक जबाबदार्या पार पाडतो, पण तो व्यापारातून कधीच रिटायर होत नाही. जोपर्यंत हात पाय चालतात तो पर्यंत तो व्यापार करीतच राहतो, असा नाटकाद्वारे व्यापार्याची व्यथा व सत्यस्थिती मांडत कलाकारांनी सुंदर सादरीकरण करत प्रेक्षकांची वाह ऽ वाह मिळविली.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रमेश कुकरेजा, मोती आहुजा, अशोक आहुजा, किशोर रंगलानी, व्दारका किंगर, मन्नू कुकरेजा, राहुल बजाज, मुकेश आसनानी, सागर बठेजा, जय रंगलानी, रुपचंद मोटवाणी, हरगोविंद चिमनानी, सुनिल पमनानी, गोविंद तलरेजा, विकी चुग, मनोज कृपलानी, उत्तम छुटाणी, शाम टेकवानी, प्रेम बजाज, सुनिल दंडवानी, अजय शादीजा, गिरिष नारंग यांनी विशेष परिश्रम घेतले.

प्रास्तविक व सूत्रसंचालन जितेश सचदेव यांनी केले. दामोदर बठेजा यांनी भारतीय सिंधू सभाच्या कार्य, उपक्रमांविषयी माहिती दिली. किशन पंजवानी यांनी आभार मानले.

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे